HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

अजित पवारांनी दुर केलेल्या संभ्रमाचा रोहीत पवारांनी केले ट्विट

पुणे | कोरोना हा आजार परदेशातून भारतात आला आणि संपूर्ण भारताला त्याने वेठीस धरले. त्यामुळे राज्य सरकार सर्व जनतेला शक्यती काळजी घेण्यास सांगत आहे. गर्दी टाळणे, स्वच्छता राखणे या सगळ्यांसोबत आहाराचीही काळजी घेण्यास सांगितले आहे. परंतू, अनेकांच्या मनात मांसाहार केल्याने कोरोनाची लागण होते का असा संभ्रम आहे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत लोकांचा हा संभ्रम दुर केला. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मुक्त संचार न करण्याचे आवाहन केले असून राज्यातील जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्याचे आदेश दिले होते.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर राज्यातील काही ठिकाणी चिकन विक्रेत्यांनी देखील आपली दुकाने बंद केली होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी चिकन विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. त्यामुळे चिकन विक्रेत्यांचा आणि खाणाऱ्यांचाही संभ्रम दुर झाला. उपमुख्यमंत्री अजित पवारांची ही सूचना कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून शेअर करत राज्यातील चिकनची दुकाने बंद ठेवण्याची गरज नसल्याचे या ट्विटरद्वारे म्हटले आहे. विक्रेत्यांचा धंदा हा पोटापाण्याचा आहे त्यावर महाविकास आघाडी नक्की विचार करेल असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Related posts

सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ

News Desk

#NirbhayaCase : सत्यमेव जयते ! अखेर चारही आरोपी फासावर

अपर्णा गोतपागर

गोविंद पानसरे हत्या प्रकरण : संथ गतीच्या तपासावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडे बोल

News Desk