मुंबई | कोरोना संकटातही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे दौरे तसंच बैठका सुरु आहेत. काल (२७ ऑक्टोबर) राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला. या बैठकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांना सलाम केला होता. त्यांच्या या ट्विटवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडेंच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी एकाप्रकारे विरोधी नेत्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले आहेत की, “धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा”.
धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा. https://t.co/ug3f21o56g
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 28, 2020
“शरद पवार साहेब, hats off… करोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,” अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला आहे.
@PawarSpeaks hats off … कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले … पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 27, 2020
दरम्यान, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर पंकजा मुंडेंना शिवसेनेकडूनम ऑफर देण्यात आली होती. त्यानंतर पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे केलेले कौतुक आणि भाऊ तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील वाद बाजूला सावंत काल एकत्र ऊसतोड कामगारांसाठी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहणे याचे संकेत राष्ट्रवादीच्या दिशेने येणारे आहेत का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.