HW News Marathi
महाराष्ट्र

रिंपाईच्या वतीने जातीवाद्याच्या विरोधात प्रांत कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा

उल्हासनगरात जातीयवाद्याच्या विरोधात आज दि.२२ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १२ वाजता शिवाजी चौकातुन मोर्चाला सुरुवात केली सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषना देत प्रांत कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढत या मोर्चात महिला सहभागी झाल्या होत्या १ जानेवारी रोजी देशभरातून भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या दलित, बहुजन समाजाच्या महिलांना, मुलांना, वृध्दांना तेथिल मनुवाद्यानी वेठीस धरून दगड फेक करून भीम अनुयांना जबर जखमी केले तसेच त्यांच्या गाड्या सुध्दा जाळून टाकण्यात आल्या. या उच्च जातीच्या लोकांनी कट कारस्थान रचून हा हल्ला करण्यात आला. ह्या हल्ले खोरावर कलम ३०७ प्रमाणे व अँट्रासिटी अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच मागासवर्गीय नगरसेवकांना जातिवाचक शब्दांचा वापर करून त्यांचा अपमान करणाऱ्या मनपा आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना ताबडतोब अटक करून तात्काळ निलंबित करण्यात यावे या दोन मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हा मोर्चा प्रांत कार्यालयावर काढुन उपविभागीय अधिकारी जयजीतसिंग गिरासे यांना पक्षाचे शहरजिल्हा अध्यक्ष व नगरसेवक भगवान भालेराव, महादेव सोनवणे, राजु सोनवणे,गंगाधर मोहोळ, प्रकाश भंडारी,यांनी निवेदन देण्यात आले.

*जनसंपर्क अधिकारी युवराज भदाने ह्यांच्या वरही अँट्रोसिटी गुन्हा दाखल*

मनपा कर्मचारी दयाराम ढोबळे ह्यांना हि भदाने ह्यांनी जातीवाचक शब्दाचा वापर करुन त्यांना अपमानीत करुन त्यांना वांरवार मानसिक ञास दिल्याने अखेर त्यांनी भदाने ह्यांच्या ञासाला कंटाळून आपल्या परिवाराचा विचार न करता आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.पण पोलिस प्रशासनांनी योग्य ती दखल न घेतल्यांने त्यांना न्यायलयात धाव घ्यावी लागली.असा सुर जनसामान्य व रिपाईचे जिल्हाध्यश नगरसेवक भगवान भालेराव ह्यानी अशी खंत व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्याचे मुख्यमंत्री पोहोचले तळीये गावात, मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री करतायेत पाहणी…..!

News Desk

संभाजीराजेंना मान्य नसले तरी ऑन पेपर ते भाजप खासदारच!

News Desk

लाखो शेतक-यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा कायम राहणार-सचिन सावंत

News Desk
महाराष्ट्र

नांदेड महापालिकेत भ्रष्टाचार, प्रशांत पोपशेटवार यांचा आरोप

swarit

नांदेड – नांदेड महापालिकेत लाड पाके समिती अंतर्गत महापालिकेच्या सफाई कामगारांना देण्यात येणाऱ्या पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष प्रशांत पोपशटवार यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी करत महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

लाड पाके समितीमध्ये सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्कानुसार कामावर घेतले जाते. महापालिकेतील नऊ सफाई कामगारांची नियमबाह्य पदोन्नती लिपीक पदावर करण्यात आली आहे. पदोन्नतीमध्ये मोठा भ्रष्टाचार असून दोषीवर कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे. दोषीवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा भष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष प्रशांत पोपशेटवार आणि सुशांत जोंधळे यांनी दिला आहे. मनपाच्या २००९-२०१० कालावधीत लाड पाके समिती अंतर्गत नियमबाह्य कर्मचाऱ्यांची भरती झाले आहेत. लोकशाही पद्धतीने संबंधीत आधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी संघटनेच्या वतीने निवेदन दिले आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास संपूर्ण नांदेडमध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीने दिला आहे.

Related posts

‘बाळासाहेब असते तर सर्वात आधी यांनाच हाकलून दिलं असतं’ – नितेश राणे

News Desk

“उनकी नींद तो खो गई, अब…”; नबाब मलिकांचं सूचक ट्विट

News Desk

साताऱ्यात ऐतिहासिक भवानी तलवारीची मिरवणूक

News Desk