HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्याच्या उपमहापौरपदी RPI च्या सुनिता वाडेकर यांच नाव निश्चित

पुणे | पुणे महानगरपालिकेची निवडणुक येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक हालचालींना वेग आला आहे. पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद भाजपकडेच राहणार, की आरपीआयला दिले जाणार? यावर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, आरपीआयने हे पद आपल्याकडेच राहावे, यासाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली होती आणि त्याला यश मिळाल्याच कळतं आहे.

त्यामुळे पुण्याच्या उपमहापौरपदी आरपीआयच्या नगरसेविका, विद्यमान गटनेत्या सुनिता वाडेकर यांच्या नावाची निवड निश्चित मानसी जात आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा देखील केली जाणार आहे. शेंडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपमहापौरपद वाडेकर यांच्याकडे जाणार, हे आरपीआयने आधीच निश्चित केले होते. आरपीआयच्या एका अंतर्गत बैठकीत वाडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे उपमहापौर पदाच्या निवडणुकीची केवळ औपचारिकताच बाकी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर

News Desk

‘शॅडो’वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच !

swarit

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत!  – अब्दुल सत्तार 

Aprna