HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांची खेळी ! मधुकर पिचडांचे खंदे समर्थक सीताराम गायकर राष्ट्रवादीच्या गोटात सामील

मुंबई । ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे खंदे समर्थक आणि भाजपचे नेते सीताराम गायकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून स्वगृही परतले आहेत. सीताराम गायकर यांनी आज (१६ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी बड्या नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नांनी सीताराम गायकर हे अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडून आले. त्यानंतर हा सीताराम गायकर यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाला आहे. गेले अनेक दिवस गायकर यांच्या प्रवेशाच्या चर्चाही रंगल्या होत्या.

अजित पवारांच्या उपस्थिती राष्ट्रवादी प्रवेश करणाऱ्या सीताराम गायकर यांना विधानसभा निवडणुकीदरम्यान मात्र त्यांच्याच अत्यंत शेलक्या शब्दांतील टिकेला सामोरे जावे लागले होते. विधानसभेदरम्यान अजित पवारांनी गायकर यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली होती. “विधानसभा निवडणुका होऊ द्या तुमचे धोतर कसे फेडतो”, अशा शब्दात अजित पवारांनी गायकर यांना इशारा दिला होता. मात्र, आता राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आहे. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला भरभरून यश मिळाले आहे. इतकेच नव्हे तर अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नांनी सीताराम गायकर हे अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडून आले आहेत.

मोठी राजकीय खेळी करत अजित पवार यांनी मधुकर पिचड यांचे खंदे समर्थक आणि भाजपचे नेते आलेल्या सीताराम गायकर यांना आपल्या बाजूने वळवून भाजपमध्ये गेलेल्या पिचड यांना मोठा धक्का दिल्याचे म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील आंबिल ओढा परिसरातल्या घरांवरचा हातोडा मागे, स्थानिकांना न्यायालयाचा दिलासा

News Desk

जनतेला सौजन्याची वागणूक देऊन त्यांची कामे सुलभ करा! – अजित पवार

News Desk

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट

Aprna