HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर पाटील यांच्या घरात कोरोनचा शिरकाव,रोहित पाटलांना कोरोनाची लागण !

सांगली | राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर.आर.पाटील यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील आणि भाऊ सुरेश पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आर.आर पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या स्थितीत लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मात्र सातत्याने लोकांमध्ये जावे लागत आहे. त्यातून अनेक लोकांशी संपर्क येत असल्याने बरीच काळजी घ्यावी लागत आहे. रोहित पाटील व सुरेश पाटील यांना देखील अशाच जनसंपर्कातून कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ८,३०८ नवे रुग्ण, तर २५८ जणांचा झाला मृत्यू

News Desk

नागपूर महापालिका सभेत गदारोळ, वैयक्तिक टीकेमुळे तुकाराम मुंढे सभागृहातून पडले बाहेर

News Desk

दिवाळीनंतर राज्यात ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरु, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

News Desk