नागपूर | “काँग्रेसने परदेशी लोकांसाठी रेड कार्पेट अंथरले. व्होट बँकेसाठी त्यांनी राजकारण केले,” असा आरोप केंद्रमंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केली. “मी देशातील मुस्लिमांना आश्वासन देतो, आमच्या संघाच्या गुरुंनी आम्हाला कधीही मुस्लिमांचा द्वेष करायला शिकवला नाही,” असेही ते म्हणाले. काँग्रेसने मुस्लमांनासाठी काय केले असा सवाल गडकरींनी केला आहे. भारतातील मुस्लिमांना बाहेर देशात गेल्यावर हिंदू म्हणूनच ओळखले जाते, असे ही ते यावेळी म्हणाले. देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देश पेटून उटला आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ आज (२२ डिसेंबर) रॅली काढण्यात आली आहे.
Nitin Gadkari: #CAA is not against any Indian Muslim, it is only to grant citizenship to persecuted religious minorities of three neigbouring nations. I appeal to our Muslim brothers,see through this misinformation campaign of Congress, they only see you as a vote machine pic.twitter.com/L9zO8pHby7
— ANI (@ANI) December 22, 2019
“सर्व धर्मियांच्या सन्मान ही भारताची संस्कृती आहे. मग हिंदू असणे हे पाप आहे का?,” असा सवाल गडकरींनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यालाविरोध करणाऱ्यांना केला आहे. देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन होत आहे. यावेळी गडकरींनी हा कायद्या उपस्थितांना समजून सांगताना म्हटले की, “हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. हिंदुत्व हीच आमची अस्मिता आहे,” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्यावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “पाकिस्तानने स्वतःला मुस्लिम राष्ट्र घोषित केले. तेव्हा महात्मा गांधींनी भारत हिंदू राष्ट्र असणार नाही, असे घोषित केले होते. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधींनी शरणार्थींना संकटकाळी आधार देण्याचो आश्वासन दिलो होतो. आमचो सरकार तेच करतोय. शरणार्थींना नागरिकत्व देतोय. त्यात काय चुकले, असा सवाल त्यांनी विचारला. तसेच पाकिस्तानमध्ये आधी १९ टक्के हिंदू होते. आता तिथे केवळ ३ टक्के हिंदू आहेत. मुस्लिम नागरिकांना शरणार्थी म्हणून आश्रय देण्यासाठी जगात १०० ते १५० देश आहेत. मात्र हिंदू, बौद्ध, इसाई, पारशी लोकांसाठी कोणताही देश नाही, असे गडकरी म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.