HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीत भाजप आणि रासपाच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दौंड तालुक्यातील भाजप व रासपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे आज (२३ डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर व माजी आमदार रमेश थोरात यांच्या पुढाकाराने दौंड येथील तात्यासाहेब ताम्हाणे, पोपटराव बोराटे, चंद्रकांत कारंडे, दादासो भिसे, जनार्दन सोनवणे, प्रकाश टिळेकर, अशोकराव बोराटे, संतोष जाधव, शिवराम ताम्हाणे, आतिष बोराटे, सतिश खुने, बिभिषण खुने, संतोष ढोरले यांनी प्रवेश केला.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, गृहमंत्री अनिल देशमुख,आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरे ३ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार ?

News Desk

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात ,मास्क घालून मंत्र्यांचे कामकाज सुरू…

News Desk

परमबीर सिंह भाजप नेत्यांच्या मदतीने परदेशात पळाले, नाना पटोलेंचा गंभीर आरोप!

News Desk