HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीने सुरुवात 

नागपूर | आज (२५ ऑक्टोबर) विजयादशमी. कोरोनाच्या या संकट काळात अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत सण उत्सव साजरा करावा लागत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपुरात पार पडतो आहे. यंदाच्या विजयादशमीला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नाही. त्यामुळे आरएसएसच्या पारंपारिक दसऱ्या सोहळा यंदा खंडित झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा संघाचा स्थापना दिवस साधेपणाने आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करुन साजरा केला जात आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली आहे.

कोरोनामुळं यंदाचा विजयादशमी उत्सव हा खुल्या मैदानात न होता सभागृहात होत आहे. नागपुरातील हेडगेवार सभागृहात हा उत्सव पार पडत आहे. त्यामुळे यंदा कुठलेही प्रात्यक्षिक झाले नाहीत. दरवर्षी या कार्यक्रमाला नागरिक आणि निमंत्रित मोठ्या संख्येनं सहभागी होतात. मात्र, यावर्षी फक्त ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा उत्सव पार पडत आहे. प्रमुख अतिथी म्हणून कोणालाही आमंत्रित करण्यात आले नाही आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांना नास्तिक आहेत म्हटले…!, राज ठाकरेंनी टोला लगावला

Aprna

पंचवटी एक्सप्रेसला गळती

News Desk

अभाविपचे सेल्फी विथ कॅम्पस अभियान, महिला सशक्तीकरणासाठी ‘मिशन साहसी’

News Desk