मुंबई | संभाजी भिडे आणि त्यांच्यासह काही राजकीय नेत्यांवरील गुन्हे मागे घेण्यात आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी हा दावा केला आहे. राज्याच्या गृह विभागकडून २००८ पासून किती नेते आणि सामान्य लोकांवरील गुन्हे दाखल गुन्हे मागे घेण्यात आले, याची माहिती मागवली होती.
Filed RTI to seek information on how many cases against political leaders&their supporters were withdrawn since 2008. 3 cases against Bhima Koregaon violence accused Sambhaji Bhide were withdrawn & 9 cases against BJP & Shiv Sena leaders withdrawn: RTI activist Shakeel A Shaikh pic.twitter.com/Fb0zLeYqud
— ANI (@ANI) October 1, 2018
यात भिडे यांनी २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या जोधा अकबर सिनेमाला विरोध करताना संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणातील भिंडेवरील गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच भिंडे यांच्यासोबत शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवरील गुन्हे मागे घेण्यात आले आहे. या दरम्यान शकील अहमद यांनी आरटीआय दाखल केली होता. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या राजकीय नेत्यावरील गुन्हे मागे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यावरील दोन गुन्हे मागे घेतले आहेत. तर शिवसेनेचे आमदार निलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर, अनिल राठोड यांच्यावरील दोन गुन्हे, आमदार अजय चौधरी आणि माजी भाजप आणि शिवसेना नेता संजय घाटगे यांच्यावरील दोन गन्हे मागे घेण्यात आले आहेत.
तसेच भाजप आमदार आणि कार्यकर्ते संजय बाळा भेगडे, भाजपचे आमदार आणि सिडकोचे अध्ये प्रशांत ठाकुर आणि त्यांचे कार्यकर्ते, विकास मठकरी, आमदार डॉ. दिलीप येलगावकर, आशिष देशमुख कार्यकर्ते आणि काँग्रेसचे नेते अभय छाजेड आणि राष्ट्रवादी काँग्रेस किरन पावसकर अशा विविध भाजपचे ५ आमदार आणि शिवसेनेचे ४ युतीचे ९ आमदार आणि इतर कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले आहेत. तर काँग्रेस १ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १ या दोन्ही पक्षातील प्रत्येकी १ नेते आणि आमदारांवरील गुन्हे मागे घेण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.