HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

मुंबई | तब्बल दीड वर्षानंतर अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती झाली आहे. अधिकृत माहितीनुसार, आज (२० ऑक्टोबर) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर उद्या (२१ ऑक्टोबर) रुपाली चाकणकर अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. दरम्यान, राज्यात एकीकडे महिला अत्याचाराच्या घटनांचं वाढतं प्रमाण आणि दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाचं रिक्त पद यामुळे विरोधकांकडून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका सुरु होती.

राज्यात गेल्या काळात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे विरोधकांनी वारंवार सरकारला कोंडीत पकडलं. हे सरकार महिला सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचा आरोप सरकारवर झाला. त्यातच, ४ फेब्रुवारी २०२० ला विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्तच होतं. त्यामुळे, भाजपने हा धागा पकडत नेहमीच सरकारला सुनावलं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही हा मुद्दा अनेकदा लावून धरल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता अखेर ठाकरे सरकारनं रुपाली चाकणकर यांची या पदावर नियुक्ती केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विनापरवाना मोटार सायकल रॅली काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार श्वेता महाले म्हणतात, “होय, आम्ही गुन्हेगार…”

Aprna

आरक्षण द्या नाही तर पुन्हा आंदोलन पेटणार

swarit

भाजपमुक्त लातूर पॅटर्न मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा! – नाना पटोले

Aprna