HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी रुपाली चाकणकर यांची निवड

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काल (२६ जुलै) पक्षाचा आणि पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर राष्ट्रवादीने आज (२७ जुलै) रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. चित्रा वाघ या भाजपमध्ये ३० जुलैला प्रवेश करणार आहे. रुपाली चाकणकर सध्या राष्ट्रवादीच्या पुणे शहराच्या महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. रुपाली यांचे काम पाहून पक्षांनी त्यांना ही मोठी जबाबदारी दिली आहे.

पुण्यात आज सुरू असलेल्या मुलाखतींच्या दरम्यान चाकणकर यांच्या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांच्याकडे देण्यात आले. चाकणकर यांची चित्र वाघ यांच्या पदी निवड केल्याने राजकीय वर्तुळ नव्या चर्चेला उधाण आले आहे. रुपला या विधानसभा निवडणुकीत खडकवासला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काकडे म्हणतात ठाकरेंची सरकारमध्ये घुसमट होतेय, अजित पवार म्हणतात, बोलणाऱ्याची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा

News Desk

विक्रमी वेळेत सावित्रीचा पूल तयार

News Desk

सर्वांना प्रवासाची मुभा देण्यास आमची हरकत नाही मात्र… राज्य सरकारने दिले स्पष्टीकरण

News Desk