HW News Marathi
महाराष्ट्र

“लबाड लांडगं ढोंग करतंय, मी पुन्हा येईनचं सोंग करतंय!”, चाकणकरांचा फडणवीसांना टोला

पुणे | ओबीसी आरक्षणासाठी भाजप पक्ष पेटून उठला आहे. यासाठी भाजपने शनिवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हाती द्या आरक्षण मिळवून देतो नाहीतर संन्यास घेईन असं वक्तव्य केलं होतं. या त्यांच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी हल्ला चढवला असून फडणवीस यांना थेट लंबाड लांडगा असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

रूपाली चाकणकर यांनी घणाघाती टीका केली आहे.

‘फडणवीस एकटेच संन्यास घेणार आहेत की मोदीजींना ही सोबत नेणार आहेत? ओबीसी आरक्षणाचा बळी देण्यात दोघांचा वाटा आहे म्हणून विचारलं. लबाड लांडगा ढोंग करतंय, ओबीसींचे नाव घेऊन मी पुन्हा येईन च सोंग करतंय…,’ असं ट्विट चाकणकर यांनी केलं आहे. दरम्यान, या त्यांच्या वक्तव्यावर स्वतः फडणवीस किंवा मग त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

 

दरम्यान, फडणवीसांच्या वक्तव्याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, मला सत्ता द्या, चार महिन्यांत आम्ही ओबीसींची प्रश्न सोडवतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. जर ओबीसींविषयी कळवळा असेल तर कसा सोडवणार हे मला सांगा मीच प्रश्न सोडवतो. तुम्ही सत्तेत येण्याची काही गरज नाही कारण महाराष्ट्रानं तुम्हाला नाकारलं आहे. पण सत्ता आल्याशिवाय मी महाराष्ट्रासाठी काहीच करणार नाही. सत्ता आली की मी सगळं काही करेन. सत्ता मिळेपर्यंत मी महाराष्ट्रातील जनतेला काहीही मदत करणार नाही, ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची आहे असं मला वाटत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदिवासी भागातील रस्ते विकासासह पूल दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देणार! – एकनाथ शिंदे

Aprna

मालपाणी कमवण्याकरता ‘हे’ सर्व लोक एकत्र आले आहेत !

News Desk

साताऱ्यात काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 2 घटना, घरं गेली दर्दी खाली

News Desk