HW News Marathi
महाराष्ट्र

नवनीत राणांनी खासदारकींचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात नशीब आजमावून पाहावं!

मुंबई | खासदार नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलं आहे. तसेच, त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचीत जातींसाठी राखीव मतदार संघ होता. त्या मतदारसंघातून नवनीत राणा या निवडून आल्या होत्या. त्यांच्या या निवडीवर आक्षेप घेताना शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगितलं आहे. न्यायमूर्ती धानुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने रद्द केलं. हे प्रमाणपत्र घेताना त्यांनी खोटी आणि बनावट कागदपत्र सादर केली होती असं निरीक्षण हायकोर्टांने नोंदवलं आहे. यावर सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. त्यांना आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टोलेवजा सल्ला दिला आहे.

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

रुपाली चाकणकर असं म्हणाल्या आहेत की, “अमरावती लोकसभा मतदार संघ हा अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. पण नवनीत राणा यांनी खोटं जातीचं प्रमाणपत्र सादर करुन खासदारकी जिंकली. आज उच्च न्यायालयाने यावरती आपला दाखला दिला आहे. ही जातीची प्रमाणपत्र खोटी सादर केली आहे. नवनीत राणा रील लाईफ आणि रिअल लाईफमध्ये खुप फरक आहे. अभिनय क्षेत्रात तुम्हाला रिटेक करत तो सीन परत करता येईल पण अमरावतीची जनता तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही. अमरावतीच्या लाखो मतदारांचा अपमान केला आहेच पण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचाही अपमान केला आहे. त्यामुळे आपल्यात थोडीतरी नैतिकता शिल्लक असेल तर आपण खासदारकीचा राजीनामा द्यावा अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं”.

काय आहे प्रकरण?

खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलं आहे. तसेच, त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचीत जातींसाठी राखीव मतदार संघ होता. त्या मतदारसंघातून नवनीत राणा या निवडून आल्या होत्या. त्यांच्या या निवडीवर आक्षेप घेताना शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगितलं आहे. न्यायमूर्ती धानुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने रद्द केलंय. हे प्रमाणपत्र घेताना त्यांनी खोटी आणि बनावट कागदपत्र सादर केली होती असं निरीक्षण हायकोर्टांने नोंदवलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या आमदारकीचा दिला राजीनामा

News Desk

“तपासावेळी सारखं पोलीसांना फोन केला की राजकीय हस्तक्षेप वाटतो म्हणुन…”!

News Desk

अनिल देशमुखांचा राजीनामा होणार? सिल्व्हर ओकवर शरद पवार,अजित पवार,देशमुख बैठक सुरू!

News Desk