HW News Marathi
महाराष्ट्र

“नाव परमविरासारखं आणि संपत्ती हडपतो बकासुरासारखी”, राष्ट्रवादीचा टोला

मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, भाजपने आक्रमक भूमिका घेतली असताना राष्ट्रवादी मात्र अनिल देशमुखांच्या मागे खंबीरपणे उभी होती. आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर केली आहे.

नोकरीसाठी महाराष्ट्रात यायचं, राज्याची नोकरी करतानाच विरोधी पक्षाची चाकरी करायची, अमाप संपत्ती कमवायची आणि शेवटी जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचं. अस कसं चालेल? अशी टीका केली आहे. रुपाली चाकणकरांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. #ParambirExposed या हॅशटॅगखाली केलेल्या ट्वीटमध्ये रुपाली चाकणकरांनी परमबीर सिंग यांच्या संपत्तीचा लेखाजोगा मांडला आहे.

मुंबईत परमबीर सिंह यांचे दोन कोटी किंमतीचे दोन फ्लॅट तर हरियाणातील त्यांच्या गावी चार कोटी रुपये किंमतीचे घर असल्याचं रुपाली चाकणकरांनी सांगितलं आहे. तसेच परमबीरांच्या पत्नीच्या नावे मुंबईत आणि हरियाणातही कोट्यवधीची स्थावर मालमत्ता असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अंधेरीतील वसुंधरा सोसायटीत २००३ साली परमबीरांनी ४८.७५ लाख रुपयांचा एक फ्लॅट घेतला तर २००७ साली नेरळमधील शगुफा सोसायटीत ३.६० कोटी रुपये किंमत असलेला एक फ्लॅट घेतल्याचा आरोपही रुपाली चाकणकरांनी केलाय. तसेच परमबीर सिंहांनी २०१९ मध्ये हरियाणामध्ये १४ लाख रुपयांची जमीन खरेदी केली असून त्यांच्या हरियाणातल्या घराची किंमत चार कोटी रुपये असल्याची माहितीही रुपाली चाकणकरांनी दिली आहे.

परमबीर सिंहांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी महिन्याला १०० कोटी रुपयांचा फंड गोळा करावा असा आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लिहलेल्या एका पत्राच्या माध्यमातून दिली होती. त्यावरुन राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडाला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. आता या आरोपांची चौकशी होणार आहे. महाविकास आघाडी सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला आर्थिक बळ ! उपमुख्यमंत्र्यांकडून शासन आदेश जारी

News Desk

पुणे होर्डिंग अपघात प्रकरणी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

Gauri Tilekar

राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यातः अशोक चव्हाण

News Desk