HW News Marathi
महाराष्ट्र

अॅड. गुणरत्न सदावर्तेंची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपली, न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

मुंबई | एस. टी. कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची आज दोन दिवसांची पोलीस कोठडी संपत आहे. यामुळे आज सदावर्तेंना आज (११ मार्च) गिरगाव न्यायालयात हजर करणार आहेत. सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी न्यायालयात पोलीस करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सदावर्तेंच्या घरी काल (१० मार्च) मुंबई पोलिसांचे एक पथक दाखल झाले होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. यावेळी पवारांच्या घरावर पोलीस बंदोबस्त नव्हता. याचाच फायदा कर्मचाऱ्यांनी घेतला. या प्रकरणी पोलिसांना आतापर्यंत १०९ जणांवर गुन्हे दाखल केले असून त्या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांविरोधात घोषणाबाजी दिली. 

गुणरत्न सदावर्ते यांच्या चिथावणीखोर भाषणानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी (८ एप्रिल) रात्रीच मुंबईतील गावदेवी पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतले होते. मध्यरात्री तब्बल ४ तास त्यांची मेडिकल तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर ज्या १०७ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांना सुद्धा न्यायालयात  हजर करण्यात येणार आहे. त्या १०७ आंदोलकांसह पोलीस कोर्टाकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, सदावर्तेंना पोलिसांनी अटक केले असून मात्र, त्यांना कोणतीही नोटीस न देता घरातून नेलं असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच माझी हत्या होऊ शकते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला असून त्यांच्या हत्येसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील, असे वक्तव्य सदावर्तेंनी त्यांना अटक केल्यानंतर होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मागासवर्गीय आयोगाने १५ नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय द्या | हायकोर्ट

swarit

अजित पवारांच्या दौऱ्यात बदल, कोल्हापूरऐवजी सांगलीला झाले रवाना

News Desk

साईबाबांच्या जन्मस्थळावरून राजकारण करून नका !

swarit