HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा विरुद्ध इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा भाजपचा डाव – सचिन सावंत  

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १४ मार्चला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पुण्याच्या नवी पेठ परिसरात या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर या आंदोलनाचे नेतृत्त्व करत आहेत. त्यांचा या आंदोलनातील सहभाग अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला आहे. गोपीचंद पडळकर MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काय करत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

यावरुन कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप ज्या पद्धतीने MPSC परिक्षा रद्द झाल्यामुळे आपली भूमिका मांडत आहे त्यावर ट्विट केले आहे. ‘MPSC परीक्षा व्हावी असे भाजपाचे गोपीचंद पडळकर म्हणतात. MPSC ची परीक्षा होऊ नये म्हणून भाजपाचे विनायक मेटे बोलतात. भाजप हा भयानक दांभिक आहे. मराठा विरुद्ध इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा भाजपाचा डाव आहे. कुटील राजकारण करणाऱ्या भाजपचा जाहीर निषेध!’, असे ट्टिट सचिन सावंत यांनी केले आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

आतापर्यंत UPSC, बँकिंग आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. आरोग्य विभागाची भरती पक्रियाही पार पडली. मग कुणाचीही मागणी नसताना राज्य सरकार एमपीएससीची परीक्षा पुढे का ढकलत आहे, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. सरकारने अधिवेशन सुरु असताना चर्चा करुन हा निर्णय का घेतला नाही? भले विद्यार्थ्यांना पीपीई किट घालायला लागला तरी चालतील पण MPSC ची परीक्षा १४ तारखेला झालीच पाहिजे. महाराष्ट्र सरकारमधील काही मंडळींनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले विनायक मेटे?

सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत नोकरभरती पुढे ढकलावी या आमच्या आवाहनाला आणि कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहून विद्यार्थअयांच्या आरोग्याच्या दृष्टीने १४ मार्चला होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली त्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार, असे ट्विट विनायक मेटे यांनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCBच्या चौकशीत काय सुरू आहे याचा तपशील माध्यमांना माहिती कसा मिळत आहे? सचिन सावंतांचा प्रश्न

News Desk

भीमा-कोरेगाव प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार!

News Desk

अजित पवार,धनंजय मुंडे,जयंत पाटलांसह बड्या नेत्यांना पोलिसांनी का पाठवली नोटीस?

News Desk