HW News Marathi
Covid-19

कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण

मुंबई | राजकारण्यांनीही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे.दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रकाँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली.गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

अशातच सरकारकडून खबरदारीचे उपायही सूचवण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमांचं पालन न झाल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, अनेक सेलिब्रिटी, खेळाडू आणि नेते या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.

 

“माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की मास्क परिधान करा. आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे. यापूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, त्यांची आई रश्मी ठाकरे, तसंच मनसेचे आमदार राजू पाटील हेदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुमच्या जिवापेक्षा मला अधिक मोलाचे काहीच नाही | राज ठाकरे

News Desk

पुण्यात चौथ्या टप्यात १५ लाख नागरिकांना कोरोना लस देण्याचं टार्गेट – मुरलीधर मोहोळ

News Desk

मुंबई महापालिकेच्या विशेष अभियांत्रिकी विभागाच्या उपायुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू

News Desk