मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्येवरून भाजप आणि काॅंग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. काॅंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पहिल्यांदा छत्रपती शिवरायांचा कन्येसंदर्भात ट्विट करून माहिती शेअर केली होती. त्याला महाराष्ट्र भाजपच्या ट्विटरवरून सचिन सावंत यांनी खोटा इतिहास टाकल्याचा आरोप केला आहे. यावर सचिन सावंत यांनी पलटवार करत उत्तर देत पुरावा सादर केला आहे. त्यावर भाजपने माफी मागावी, असेही सचिन सावंत यानी म्हटले आहे.
“भाजपचा तोंड फाडणारा पुरावा हा पहा! सकवारबाई या महाराजांच्या कन्या होत्या व त्यांच्या एका पत्नीचे नावही तेच होते. भाजपने शिवरायांचा अपमान केला, माझी बदनामी केली. अकलेचे तारे तोडल्यामुळे भाजपने तात्काळ माफी मागावी. शिवरायांच्या इतिहासात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत”, असे सांगत सचिन सावंत यांनी एका पुस्तकातील उल्लेख असलेला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
सचिन सावंत यांनी काय ट्विट केले होते?
ट्विटरवरून माहिती देताना सचिन सावंत म्हणाले की, “शिवरायांच्या कन्या सकवारबाई उर्फ सखू सासरी जात असताना शत्रू सैन्याने हल्ला केला. त्यावेळी त्यांना वाचविणाऱ्या वाल्हे गावच्या महार समाजातील ंमंडळींना त्यांनी भोसले हे नाव दिले. गावकुसाबाहेर राहणाऱ्या महार, मांग, घोर, चांभांर व रामोशी यांना शिवरायांनी मानाचे स्थान दिले.
यावर भाजपने काय आक्षेप घेतले होते?
सचिन सावंत यांच्या ट्विटवर भाजपने आक्षेप नोंदवला आणि ट्विट करत असं म्हटलं की, काॅंग्रेस आणि त्यांचा खोटा इतिहास काही नवीन नाही. महाराणी सकवारबाई या शिवरायांच्या पत्नी व सखुबाई या कन्या होता, मात्र सकवारबाईंना शिवरायांच्या कन्या लिहून काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. काॅंग्रेसने स्वतःच्या खोट्या इतिहासाचे दाखले जरूर द्यावेत. मात्र, शिवरायांच्या इतिहासात असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही, अशी टीका भाजपने सचिन सावंत यांच्यावर केली होती.
भाजपाचा तोंड फोडणारा पुरावा हा पहा! सकवारबाई या महाराजांच्या कन्या होत्या व एका पत्नीचे नाव ही तेच होते. भाजपाने शिवरायांचा अवमान केला. माझी बदनामी केली. अकलेचे तारे तोडल्याबद्दल @BJP4Maharashtra ने तात्काळ माफी मागावी. शिवरायांच्या इतिहासात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत https://t.co/Nlh6YFZAa2 pic.twitter.com/sEUgG1ah3I
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 22, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.