HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपने राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही – सचिन सावंत

मुंबई | भाजपने राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही. त्यांनी देवालासुद्धा राजकारणाच्या आखाड्यात ओढलं,” अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली. ते मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.भाजपच्या मनात देवाविषयी भक्तीभाव नाही. मात्र, राजकारणाच्या आखाड्यात देवाला ओढण्याचा प्रयत्न भाजप नेहमीच करत राहीला आहे,” असं सावंत म्हणाले. तसेच, कोरोना संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे जनतेने आपली काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. राज्यातील सर्व मंदिरं सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. त्यानंतर पाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व मंदिरं सुरु करता येतील अशी घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु झाली आहेत. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केले. तर मुख्यमंत्र्यांना हे उशिराने सुचलेलं शहाणपण आहे, असं म्हणत विरोधकांनी सरकारवर टीका केली. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांनी ‘या’ निमित्ताने आपल्या पक्षात आत्मचिंतन घडवावे !

News Desk

‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’ , भाजपकडून मंदिरे सुरू करण्यासाठी आंदोलन

News Desk

नांदेड येथे पोलीस आयुक्तालयाबाबत लवकरच मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव! – दिलीप वळसे पाटील

Aprna