HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधानांबरोबरच नीती आयोगाकडूनही खराखुरा घरचा मोठा आहेर, कॉंग्रसने डिवचले

मुंबई | एकीकडे “मुंबईतील कोरोना मृत्यूंची अचूक आकडेवारी न देता चाचण्यांबाबतही तडजोडी करून, करोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करण्यात येत आहे.”, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

तर दुसरीकडे, राज्यातील कोरोना परिस्थिती, रेमडेसिविर, प्राणवायू आणि लसींच्या तुटपुंज्या पुरवठ्यावरून राज्य सरकारकडून सातत्याने केंद्रावर टीका केली जात असतानाच दुसरीकडे राज्याच्या करोनाविरोधातील लढ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं. शिवाय, मुंबई महापालिकेच्या कोरोना व्यवस्थापनाचं सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ केंद्र सरकारच्या नीती आयोगानेही कौतुक केलं आहे. यावरून आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले सचिन सावंत?
“फडणवीस साहेबांना पंतप्रधानांबरोबरच नीती आयोगाचे प्रमुख अमिताभ कांत यांच्याकडूनही अगदी घरचा मोठा आहेर मिळाला आहे! महत्वाचे म्हणजे हा आहेर आभासी नाही, खराखुरा आहे.” असं सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. शिवाय, त्यांनी नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी मुंबई मनपाचं कौतुक केलेलं ट्विट देखील सोबत जोडलं आहे.

तर, “केंद्रीय पद्धतीने बेडचं वाटप करणं, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणं, इतकंच नाही तर खासगी रुग्णालयातील बेडचंही वाटप करणं आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणं, रुग्णांच्या तब्येतीबद्दल पाठपुरावा करण्यासाठी वॉर रुम निर्माण करणं. मुंबईचं करोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या ग्रेट टीमचं अभिनंदन,” अशा शब्दात नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी मुंबई महापालिका आणि आयुक्तांचं कौतुक केलं आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपा कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर आशिष शेलार यांचं मोठ विधान, म्हणाले…

News Desk

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देणारा अर्थसंकल्प! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

खड्ड्यांविरोधात ते झाले अर्धनग्न!

News Desk