HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली 

मुंबई | मनसुख हिरेन हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझे यांची तब्येत पुन्हा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. काल (२९ मार्च) रात्री साडेदहाच्या सुमारास NIAच्या अधिकाऱ्यांनी वाझे यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर सचिन वाझे यांना परत आणण्यात आल्याची माहिती आहे.सचिन वाझे यांची याआधीही प्रकृती एकदा बिघडली होती. तेव्हाही त्यांना उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तसेच त्यावेळी एनआयएच्या कार्यालयात मध्यरात्री डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं होतं.

काही दिवसांपूर्वीच सचिन वाझे यांनी आपण सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर आणि कॉम्प्युटर मिठी नदीत टाकल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांना सचिन वाझे यांना घटनास्थळी नेऊन या सर्व गोष्टी मिठी नदीतून मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने शोधून काढल्या होत्या. तसेच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यांच्या विरोधातही NIAने UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे सध्या अडचणीत आलेले सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन करण्यात आलं आहे. यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हे सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. पण मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी संशयित असलेल्या वाझेंना अटक करण्यात आली होती. यानंतर याप्रकरणी दररोज अनेक धक्कादाक खुलासे होत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा विनयभंग केला नाही !

News Desk

मंगळवेढा तालुक्यात भारत भालके यांच्या गटाला धक्का, शिवसेनेने मारली बाजी

News Desk

५वी आणि ८वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, वर्षा गायकवाडांची घोषणा

News Desk