HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझेंचा NIA कोर्टात जामिनासाठी अर्ज

मुंबई | मनसुख हिरेन हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या गाडीप्रकरणात सहभागाबद्दल NIA च्या कस्टडीत असलेल्या सचिन वाझेने जामिनासाठी अर्ज केला आहे. मुंबई पोलिसांमधून निलंबीत करण्यात आलेल्या सचिन वाझेचा मनसुख हिरेन आणि अँटेलिया प्रकरणात सहभाग असल्याचे पुरावे NIA ला मिळाले आहेत. परंतू आपल्याला अटक केल्यानंतर ९० दिवस उलटूनही NIA ने चार्जशीट दाखल केलेली नसल्यामुळे सचिन वाझेने कोर्टात धाव घेतली आहे. ANI वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.

सचिन वाझे सध्या तळोजा येथील कारागृहात कैद आहे. सचिन वाझेसोबत काम करणारे CIU युनिटमधील तत्कालीन कर्मचारीही NIA च्या कस्टडीत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. या प्रकरणात ईडीनेही सचिन वाझेची तळोजा कारागृहात चौकशी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वर्नोन गाेन्सालवीस, अरुण फरेरा काेर्टात हजर

News Desk

“इतरांप्रमाणे आमदारांना घरे मिळत असतील तर…” – छगन भुजबळ

News Desk

लोकांना वाटतं की मी कोरोनाची लस घेतली आहे – शरद पवार

News Desk