HW News Marathi
महाराष्ट्र

घाबरलो नाहीत आणि घाबरणारही नाही, राहुल गांधींचं आवाहन

नवी दिल्ली | काँग्रेस कार्यकर्त्यांची नुकतीच वर्चुअल बैठक पार पडली. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी या बैठकीचा फोटो ट्विट करत आपल्या कार्यकर्त्यांना एकमेकांसोबत ताकद म्हणून उभा राहण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी ‘एकमेकांची ताकद बनून उभं राहू – घाबरलो नाहीत आणि घाबरणारही नाही’ असं म्हटलंय. ‘काँग्रेसला भेकड नव्हे, तर निडर लोकांची आवश्यकता आहे. आमच्या पक्षात जे भाजपला घाबरतात त्यांनी बाहेर जावं’, असं सल्ला राहुल गांधींनी दिला आहे.

शिंदे घाबरले आणि त्यांनी आरएसएसचा रस्ता धरला

आरएसएस सध्या मुस्लिम बांधावं सोबत एकत्र येण्याच्या घोषणा देत आहेत. बैठकीत राहुल गांधी आरएसएस आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. ‘शिंदे घाबरले आणि त्यांनी आरएसएसचा रस्ता धरला’ असं वक्तव्यही राहुल गांधी यांनी या बैठकीत केलं. गेल्या काही महिन्यांत काँग्रेसचे अनेक नेते भाजपम्ये दाखल झाले आहेत. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे आणि जितीन प्रसाद ही प्रमुख नावं आहेत.

काँग्रेस नेत्यांची कानउघाडणी

राजकारणात कुरघोड्या, हेवेदावे, मतभेद यात काही नवल नाही .तसंच पक्षांतरही नवीन नाही. अनेक छोट्या-बड्या नेत्यांकडून आजवर पक्षांतरं झाली. तशी कॅांग्रेसमध्येही झाली. मात्र आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांवर पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे. काँग्रेस सोडणारे नेते RSS ची माणसं आहेत. काँग्रेसला निडर नेत्यांची गरज आहे. कमजोर नेत्यांची नाही. संघाच्या विचारधारेवर विश्वास ठेवतील अशी माणसं काँग्रेसला नको. अशा नेत्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवायला हवा अशा कडक शब्दात राहुल गांधींनी सुनावलं आहे

देशात खूप असे नेते आहेत जे निडर आहेत, पण काँग्रेसमध्ये नाहीत

काँग्रेस पक्ष सध्या स्वबळाची भाषा करत आहेत. त्यामुळे महाविकासआघाडी मध्ये तिढा निर्माण होताना दिसत आहे. काँग्रेसमध्ये राहून ज्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे अशांना राहुल गांधींनी स्पष्ट इशाराच दिला आहे. ‘देशात खूप असे नेते आहेत जे निडर आहेत, पण काँग्रेसमध्ये नाहीत. या नेत्यांना पक्षात आणलं पाहिजे. जे भाजपाला घाबरतात अशा काँग्रेसी नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे. आम्हाला अशा नेत्यांची गरज नाही. जे आरएसएसच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात. आम्हाला निडर लोकांची गरज आहे.’असं स्पष्ट मत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेते नितेश राणेंच्या छातीत दुखू लागल्यामुळे उपचारासाठी कोल्हापुरात आणले

Aprna

“२४ तासात चौकशीसाठी हजर राहा, नाहीतर घरी येऊन चौकशी करू”, देशमुखांना ईडीचं उत्तर

News Desk

मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची राष्ट्रवादीत!

News Desk