मुंबई | मनसुख हिरेन मृत्यू आणि प्रसिद्ध उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. स्फोटके प्रकरणात अटक झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याप्रकरणी आदेश काढले आहेत.
‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास १६ वर्षांनंतर पुन्हा पोलिस दलात परतले होते. मात्र मनसुख हिरेन हत्याप्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर, त्यांना आता पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
Sachin Hindurao Waze has been dismissed from the police service, says Mumbai Police
Waze is an accused in Mansukh Hiren death case and Antilia bomb scare case
(the man in the center in the file pic) pic.twitter.com/jZHDs3eJzx
— ANI (@ANI) May 11, 2021
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमकं काय?
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चला मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत NIA ने सचिन वाझे यांना अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.