HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझे म्हणजे लादेन नाही, दोषी असणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणारच – उध्दव ठाकरे

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजच्या (१० मार्च) शेवटच्या दिवशीही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपली होती. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरुन विरोधकांनी सरकारला जेरीस आणले. दरम्यान, अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की मनसुख हिरेन यांच्या मृत्युमध्ये कोणाचाही समावेश असला तरी त्याला दया, माया दाखवली जाणार नाही. आणि सचिन वाझे काही ओसामा बिन लादेन नाही आहेत. त्यामुळे आधी नीट तपास होऊ द्या यात जो दोषी असेल त्याला सरकार शिक्षा करणार.

“मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा, अशी तपासाची पद्धत नसते. कुणी तपासाला दिशा देऊ शकत नाही. एखाद्याला टार्गेट करायचं आणि त्याला आयुष्यातून उठवायचं अशी पद्धत सध्या सुरू आहे, असं सांगतानाच सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीने चित्रं तयार केलं जात आहे. ते कशासाठी?, असा सवालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला आहे”.

“अधिवेशन घेणं कोरोनात आव्हानात्मक होतं. पण नियम पाळून अधिवेशन घेतलं. विरोधकांनीही उत्तम सहकार्य केलं. परवा अर्थसंकल्प सादर केला. आव्हानात्मक स्थिती असतानाही हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तरीही रडगाणं न गाता ‘महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि थांबणार नाही’, हे आपलं ब्रीद वाक्य आहे. त्यानुसार सर्व घटकांना आपण सामावून घेण्याचा, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…ST कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात कशी झाली वाढ?

News Desk

युजीसी फंडाची माहिती मागणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षातून हकलले 

News Desk

… लोकांना उल्लू बनविण्याचे धंदे करत आहात!; जलीलांची राज्य सरकारच्या मराठी पाट्यांवर टीका

Aprna