HW News Marathi
Covid-19

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष भेटेल, पण मंत्री भेटत नाहीत ! सदाभाऊ खोत

मुंबई । “राज्याला काळजीवाहू मुख्यमंत्री हवा आहे. राज्यातले सरकार हे ठेकेदारासाठी चालवत आहे का ?असे वाटू लागले आहे. राज्यात चांगली आरोग्य सेवा राज्य सरकार देऊ शकत नाही. एकवेळ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष भेटतील पण मंत्री भेटत नाहीत”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर केली आहे. ते (२९ एप्रिल) सांगलीमध्ये बोलत होते.

“सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी अवस्था झाली आहे. हे सरकार खंबीर नाही. सांगली जिल्हा हा मृत्यूचा सापळा झाला आहे. तर दुसरीकडे मयत रुग्णांना धन देण्यासाठी १० हजार पावती करावी लागत आहे. जिल्ह्यात रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नाहीत. बैठकीत आम्ही गेल्या वेळी मुद्दा उपस्थित केल्यावर आम्हा विरोधकांची पालकमंत्री यांनी खिल्ली उडवली होती”, अशी नाराजी देखील सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे.

“राज्यात राज्य सरकार चांगली आरोग्य सेवा देऊ शकत नाही. तसेच लसीकरणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही”, असाही आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालाबाबतही सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली. “पश्चिम बंगालमध्ये भाजपलाच बहुमत मिळणार आहे. जनतेचा कौल हा भाजपलाच आहे”, असे खोत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एफआयआर दाखल करण्यामागे राजकीय षडयंत्र, अर्णब गोस्वामींचा दावा

News Desk

ठाकरे सरकारचा निर्णय! राज्यातील सर्व आशा सेविकांना २ हजार, तर आशा गटप्रवर्तकांना ३ हजार मानधन

News Desk

देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५ लाखांच्या पार

News Desk