HW News Marathi
महाराष्ट्र

मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये जशी फूट पडली तशी महाराष्ट्रात मोठी फूट पाहायला मिळेल – सदाभाऊ खोत

पंढरपूर | राज्यात महाविकास आघाडी सरकार त्यांच्यातील विरोधामुळे कोसळतील असे दावे अनेक वेळा विरोधी पक्षाने केले. आघाडीतील काही मतभेद, कुरबुरी समोर आल्या मात्र सरकारने त्या सर्व फेटाळून लावल्या. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्यातील विरोधामुळे कोसळेल असा दावा केला होता. त्यानंतर आता माजी कृषिमंत्री आणि रयत संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही आघाडीबाबत दावा केला आहे.

राज्यातील आघाडी सरकार हे कोरोनाच्या तीरडीवर झोपलेले कोरोनाग्रस्त सरकार असून संपूर्ण सरकारच क्वारंटाइन झाल्यासारखी राज्यातील सध्याची स्थिती आहे. रुग्णांना उपचारांसाठी बेड उपलब्ध नाहीत. कोरोना सदृष्य लक्षणे असलेल्या व्यक्तींची वेळेत चाचणी केली जात नाही. एकीकडे ही दयनीय अवस्था असताना विकासालाही पूर्णपणे ब्रेक लागला आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले. या स्थितीमुळेच सत्ताधारी तिन्ही पक्षांतील आमदारांची नाराजी वाढत चालली असून या नाराजीचा स्फोट होऊन राज्यातील सरकार कोसळणार आहे, असे भाकीत सदाभाऊ खोत यांनी केले आहे. पुढील दोन महिन्यांत मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये जशी मोठी फूट पडली तशी महाराष्ट्रात पाहायला मिळेल, असे खोत म्हणाले.

तसेच महाविकास आघाडीतील काही आमदार हे विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. आणि आघाडीतील मोठा गट फुटलेला दिसेल असा दावा देखील खोत यांनी केला आहे. इतक्यावरच न थांबता पुढे ते म्हणाले की, आमदार फुटणार नाहीत या समज असून दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची अनेक आमदारांची मनाची तयारी असेल, असा टोलाही यावेळी त्यांनी जयंत पाटील यांना लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडी सरकारने बीडला केवळ वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत,पंकजा मुंडेंचा आरोप

Arati More

पंकजा मुंडे यांना धक्का! भाजपा चे माजी आमदार राष्ट्रवादीच्या गोटात.. जिल्हा बँकेसंदर्भात राष्ट्रवादी च्या बैठकीस हजेरी..

News Desk

आज आपण एका गाडीत बसू शकलो नाही…!

swarit