HW News Marathi
महाराष्ट्र

“गांजाच्या शेतीसाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागावी”, सदाभाऊ खोत कडाडले

सांगली | लॉकडाऊनमुळे राज्यातील हॉटेल व्यावसायिक पर्यटन उद्योग तसेच इतर व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या अडचणीत त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने त्यांना वीज बिलात आणि मालमत्ता करात सवलत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत केली होती. याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

शेती उद्‍ध्वस्त झाली आहे, शेतमाल कुजून जातो आहे. अशावेळी शेतकऱ्यांना या संकाटातून बाहेर काढण्यासाठी या खरीप हंगामात त्यांना गांजा पिकवायला परवानगी द्यावी. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना तसे पत्र लिहून परवानगी मागावी, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीका केली आहे.

राज्यातील देशी दारू, बिअरबार चालकांच्या नुकसानीची शरद पवार यांना काळजी लागली आहे. त्यांच्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आहेत. मात्र या जाणत्या राजाने शेतकऱ्यांच्या अश्रूकडे, कष्टकऱ्यांच्या वेदनांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवारांचं पत्र वाचून मला एकच प्याला नाटकाची आठवण झाली. त्यातील नायक सुधाकर याला त्या एकाच प्यालात गरिबांच्या झोपड्या, अनेकांचे श्रम, दीनदलितांच्या व्यथा सामावल्यासारख्या वाटत होत्या. पवारसाहेबांचं तसेच झालं असावं. राज्यात शेतकरी उद्‍ध्वस्त झाला आहे. फळे, भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. बाजारपेठ बंद आहे. अवकाळीच्या भरपाईची चर्चाही नाही. नाशवंत शेतमालाचे नियोजन सरकारने करायला हवं होतं, तसं झालं नसल्याचं खोत यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी हॉटेल आणि बार मालकांच्या प्रतिनिधींनी शरद पवारांची भेट घेऊन लॉकडाउन काळात होत असलेलं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी सवलत द्यावी अशी विनंती केली होती. ज्यानंतर पवारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून हॉटेल आणि बारमालकांना सवलती देण्याबद्दल विनंती केली होती. ज्यावर खोत यांनी, “या राज्यातला शेतकरी अडचणीत नाही आला का? बारा बलुतेदार, शेतमजूर, छोटे व्यवसायिक अडचणीत नाही आले का?? यांच्यासाठी पवार साहेब मदत मागणार आहेत का?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेनेचा दणका! अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडले

News Desk

महाविकास आघाडी सरकारने १५ मोठ्या कंपन्यांसोबत केलेल्या कराराने औद्योगिक क्षेत्राला भरारी मिळणार – महेश तपासे

News Desk

जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार; कंत्राटदारांवर 4 हजार कोटींची खैरात : धनंजय मुंडे

News Desk