HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

राजू शेट्टी आता काजू शेट्टी, मंत्रिपद गेल्याने हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाला !

मुंबई | राज्यभरात आज (१ ऑगस्ट) झालेल्या दूध दरवाढीच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत या दोघांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. “राजू शेट्टी आता काजू शेट्टी झाला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाला आहे”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. मात्र, यावेळी सदाभाऊ खोत यांची जीभ चांगलीच घसरली आहे. सदाभाऊ खोत यांनी एका पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांच्यावर टोकाची टीका केली आहे.

“राजू शेट्टी आता काजू शेट्टी झाला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाला आहे. प्रत्येक गावात देवाच्या नावाने जसा एक वळू-रेडा सोडलेला असतो. तसा हा वळू रेडा आहे. त्याला आता शेतकऱ्यांनी सोडून दिलेला आहे. हा रेडा आता कोणत्याही पिकात अगदी दिसेल त्या पिकात आता तोंड घालू लागला आहे”, अशी अत्यंत टोकाची टीका सदाभाऊ खोत यांनी केली. यावेळी सदाभाऊ खोत यांची जीभ चांगलीच घसरल्याचे म्हटले जात आहे.

“सदाभाऊ खोत २ वेळा खासदार करायला त्या वळू रेड्याबरोबर होता. तेव्हा दोन्ही हातांनी हा सदाभाऊचा गजर करत होता. तेव्हा सदाभाऊ चालत होता. पण त्यांना सत्ता मिळाली नाही. केंद्रातही मंत्रिपद मिळाले नाही. मात्र, त्यांच्या सहकाऱ्याला मंत्रिपद मिळाले. त्यामुळे लगेच त्याच्या पोटात वाईचा गोळा उठला”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

“राजू शेट्टी माझ्यावर अनेक आरोप करतात. त्यांच्याकडे जर माझ्याविरोधात पुरावे असतील तर त्यांनी खुशाल न्यायालयात जावे. आपल्या देशात न्यायव्यवस्था आहे. या सदाभाऊने त्यांच्यासारख्या ३००-४०० एकर जमिनी घेऊन ठेवलेल्या नाहीत. सरकारला आंदोलनाची भीती दाखवून जवळच्या सहकाऱ्यांना पेट्रोल पंप, संस्था काढून आम्ही सरकारचे पैसे नाही खाल्लेत”, अशी आरोपही यावेळी सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

Related posts

नक्षली हल्ल्यातील शहीद जवानांना मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची श्रद्धांजली

News Desk

‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात!

News Desk

“राजकारण न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला संजय राऊत अन् जयंत पाटलांना ?”

News Desk