HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

सुरक्षित सोपं आहे ! ‘कोरोना’संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाच्या ‘१४’ प्रमुख सूचना

मुंबई | ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन जारी केले आहे. एकूण २१ दिवसांचा हा लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा-सुविधा वगळता बाकी संपूर्ण देश लॉकडाऊन राहणार आहे. देशातील नागरिकांनी अत्यावश्यक कारण नसल्यास घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, स्वछता पाळावी अशा अनेक प्रकारच्या सूचना केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी केल्या जात आहेत. आता पुन्हा एका मुख्यमंत्री कार्यालयाकडून नागरिकांसाठी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर १४ सूचना करण्यात आल्या आहेत. “सुरक्षित सोपं आहे” या शीर्षकाखाली मुख्यमंत्री कार्यालयाकडून या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या ‘१४’ सूचना पुढीलप्रमाणे

१)  ग्राहकांनी दुकानाबाहेर योग्य अंतर राखून रांगेत उभे राहावे.

२) आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी केवळ एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे.

३) घराबाहेर पडताना मास्क वापरावा.

४) खरेदी करताना व पैसे देताना दुकानदारापासून योग्य अंतर राखा.

५) घराबाहेर असताना अनावश्यक वस्तूंना हात लावणे टाळा.

६) पोलिसांनी थांबविल्यास तुमचे घराबाहेर पडण्याचे कारण स्पष्ट करा.

७) गर्दी व संसर्ग टाळण्यासाठी दुकानदारांनी व्हाट्सअँपवर ऑडर घेऊन ग्राहकांना डिलिव्हरीची वेळ द्यावी.

८) अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर असलेल्यांनी आपले ओळखपत्र सतत जवळ ठेवावे.

९) ड्रायव्हर, नोकर इ. यांना पगारी रजा द्या. कामावर येताना त्यांना संसर्ग झालं तर तो तुम्हालाही होऊ शकतो.

१०) डिलिव्हरीसाठी येणाऱ्या व्यक्तीपासून सुरक्षित अंतर राखा.

११) घरी आल्यावर प्रथम आपले हात साबण व पाण्याने धुवा.

१२) खरेदीसाठी एक वेगळी पिशवी राखून ठेवा.

१३) संसर्गाची शक्यता कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक टाळा.

१४) संसर्गाची चिन्हे दिसल्यास प्रथम स्वतःला सर्वांपासून वेगळे करा आणि हेल्पलाईनवर फोन करा.

 

Related posts

आता आधार कार्डसाठी जीएसटी

News Desk

आपल्या विधानानंतर अवघ्या २४ तासातच राहुल गांधींनी दिले हे स्पष्टीकरण

Gauri Tilekar

पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात !

News Desk