HW News Marathi
देश / विदेश

“हिंदूस्थान म्हणजे निर्लज्ज लोकांचा देश”-संभाजी भिडे

सांगली | संभाजी भिडे हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा देशाबद्दल बोलताना त्यांचा तोल ढासळला आहे. ”आपण निर्लज्जपणात पहिल्या क्रमांकावर आहे. जगाच्या पाठीवर 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, परदास्या, परवशता, गुलामी आणि दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा आहे. बेशरम लोकांचा, एक अब्ज २३ कोटी लोकांचा देश जगात आहे. हा निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदूस्थान आहे”, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं.

दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात…

सध्या त्याचा एक व्हिडिओ समोर आला असून ते सांगलीत दुर्गामाता दौडच्या समारोप प्रसंगी बोलत होते.आपल्या देशाची लोकसंख्या हे जगात क्रमांक दोनवर आहे. पण, आपल्या देशाने निर्लज्जपणात पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे. देशात देशभक्तीचा, स्वातंत्र्याचा, भक्तीचा, आपण कोण आहोत? याची जाणीव नाही. आपला-परका कोण मित्र कोण हे कळत नाही.

या देशात कसले सरकार आहे. हा देश जगाचा बाप बनवा. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोहीम हाती घेतली होती. ती मोहीम पार पाडण्यासाठी आपण मोहीम करतो. मागच्या वर्षी आपल्या या कर्तृत्वसंपन्न शासनाने महाराष्ट्रात कोरोना वाढतो. कोरोना येतो, हा थोतांड आहे. कोरोना हा काल्पनिक आहे. कोरोना हा मानवाला न होणारा रोग आहे. कोरोना हा थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे, असेही भिडे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंताजनक ! राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखाच्या पार

News Desk

मेधा कुलकर्णींनी पंतप्रधानांना बांधली राखी! मागितलं ‘हे’ बक्षीस

News Desk

महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्यामुळे राज्यभर बंदची हाक

News Desk