HW News Marathi
देश / विदेश

उदयनराजेंच्या समर्थनार्थ संभाजी भिंडेंची सांगली बंदची हाक!

सांगली | खासदार संजय राऊत आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये जे आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत,त्या वादामध्ये आता शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिंडे यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शुक्रवारी म्हणजे उद्या सांगली बंदची हाक दिली आहे.एकीकडे आज साताऱ्यात उदयनराजे समर्थकांनी कडकडीत बंद पाळून संजय राऊत यांचा निषेध केला,तर दुसरीकडे उद्या सांगली बंदचं आवाहन करण्यात आले आहे.

संभाजी भिडे म्हणाले, “संजय राऊतांनी उदयनराजेंबद्दल वक्तव्य करुन देशाचा अपमान केला आहे. हा अपमान छत्रपती परंपरेचा अपमान आहे, असं आम्ही मानतो. याचा निषेध म्हणून 17 जानेवारीला सांगली बंद राहील” असं संभाजी भिडे म्हणाले. संजय राऊत यांना पदावरुन हटवावे अन्यथा बंद यापुढेही कायम राहील” असा इशाराही संभाजी भिडे यांनी दिला.

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावर टीका करत उदयनराजेंना सवाल केले होते. त्यावेळी उदयनराजेंनी थेट शिवसेनेला लक्ष करत शिवसेना नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांना विचारलं होतं का, असा प्रतिसवाल केला. त्यानंतर संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वांचा अधिकार आहे. कुणा एकाची ती मक्तेदारी नाही असं म्हणत उदयनराजेंना वंशज असल्याचे पुरावे दाखवा, असं म्हटलं. यानंतर हा वाद वाढला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयसीएसई बोर्डाकडून दहावी-बारावीचा निकाल आज होणार जाहीर

News Desk

मोठी बातमी ! विशेष न्यायालयाकडून सचिन वाझेंना १० दिवसांची NIA कोठडी

News Desk

भाजपला पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यातील तीन जागा मिळवण्यात यश

News Desk