HW News Marathi
महाराष्ट्र

“पुण्यातील मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नावं द्या”, संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे | पुणे मेट्रोची नुकतीच ट्रायल पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं होतं. अजित पवारांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल पार पडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडनं एक महत्वाची मागणी केलीय. पुण्यातील मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नावं द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकरून करण्यात आली आहे. त्याबाबत संभाजी ब्रिगेडनं एक पत्र महा मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांनाही दिलं आहे. या पत्रात 13 महापुरुषांची नावंही त्यांच्याकडून सुचवण्यात आली आहेत.

काय आहे पत्रात?

पुणे हे विद्येचे माहेरघर असून सांस्कृतिक, परिवर्तनवादी आणि पुरोगामी चळवळीचा वसा आणि वारसा जपणारे शहर आहे. राष्ट्रमाता जिजाऊ मँसाहेब यांनी वसवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच पुण्यातून रोवली. पुणे जिल्ह्याने दोन छत्रपती दिले. मल्हाराव होळकर, राजमाता अहिल्याराणी होळकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डाॕ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद साळवे, दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, सरसेनापती वीर बाजी पासलकर… आदी समाजसुधारकांच्या व महापुरुषांच्या विचारधारेतून हे पुणे नटलेले आहे. या महापुरुषांचा वैचारिक व वारसा आपण जपलं पाहिजे म्हणून त्यांच्या विचारांतून प्रेरणा मिळावी म्हणून वैचारिक ठेवा जपान करण्याचं काम आपण केले पाहिजे.

यादीत कोणती नावं?

1) छत्रपती शिवाजी महाराज

2) छत्रपती संभाजी महाराज

3) मल्हाराव होळकर

4) राजमाता अहिल्या राणी होळकर

5) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले

6) राजर्षी छत्रपती शाहू महाराज

7) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

8) लहुजी वस्ताद साळवे

9) दिनकरराव जवळकर

10) केशवराव जेधे

11) सरसेनापती वीर बाजी पासलकर

12) महादजी शिंदे

13) शिवशाहीर अण्णाभाऊ साठे

उपमुख्यमंत्रयांच्या हस्ते उदघाटन

उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या हस्ते 30 जुलै रोजी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन झाली. अजित पवारांनी रिमोटने मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास पुणे मेट्रो धावली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते.

मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन – फडणवीस

पुणे मेट्रोच्या ट्रायल रनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. त्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यावरुन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यामुळे पुणे मेट्रोवरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचं बोललं जात आहे. श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे फडणवीसांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केल्याची चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांना UPAचं अध्यक्ष करा आणि काँग्रेसचं पुनर्गठन करा, राऊतांचा काँग्रेसला सल्ला

News Desk

विम्याचे पैसे न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार!

News Desk

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात!, सखल भागात पाणी भरले

News Desk