सातारा | राज्यात औरंगाबाद शहराच्या नामांतराचा वाद तापलेला असताना आता साताऱ्यात संतप्त अशी एक घटना घडली आहे. सातारा शहरातील पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काल (८ जानेवारी) खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. या मार्गाचे तीनही प्रवेशद्वारांना छत्रपतींची नावे देण्यात आले होते. यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक समाजकंटकाने फाडल्याचे आज (९ जानेवारी) सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. उदयनराजे समर्थक मोठ्याप्रमाणात घटनास्थळी जमा झाल्याने साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी कार्यकर्ते व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोवईनाका येथील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन झाले. या ३ भुयारी मार्गांचं श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज भुयारी मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. दरम्यान, आज (९ जानेवारी) सकाळी छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग असे लिहिलेला नाम फलक अज्ञाताने फाडल्याचे निदर्शनास आले. शहरात याची माहिती समजताच पोवईनाक्यावर खासदार उदयनराजे समर्थक जमा होऊ लागले. पोलिसांच्या ही बाब निर्दशनास येताच त्यांनी तातडीने हा फलक काढून ताब्यात घेतला आहे.
त्यानंतर उदयनराजे समर्थक ॲड. दत्तात्रेय बनकर, संग्राम बर्गे, सातारा विकास आघाडीचे नगरसेवक व कार्यकर्ते यांनी केवळ संभाजी महाराजांविषयीच असे का घडते या घटनेमागे कोण आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे या घटनेचे पडसाद काय उमटणार, राजकीय वातावरण आणखी तापणार का हे पाहावे लागणार आहे.
सातारा शहरवासीयांसाठी स्वप्नवत व महत्वकांक्षी असलेला प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराज ग्रेडसेपरेटर चे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले.
सातारा शहराची मोठी वाहतूक कोंडी या भव्य प्रकल्पामुळे सुरळीत होण्यास मदत होणार आहे. pic.twitter.com/9fkszLOsiq— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 8, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.