मुंबई | राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडणूक लढणार नाही, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे. संभाजीराजेंनी आज (२७ मे) मराठी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभा निवडणुकीसंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजे म्हणाले, “घोडेबाजार होणार आणि घोडेबाजारसाठी माझी उमेदवारी नाही. आणि घोडेबाजार होऊ नये म्हणून मी या निवडणुकीसमोर जाणार नाही. पण ही माघार नाही, हा माझा स्वाभिमान आहे. माझ्यासाठी खासदारकी महत्वाची नाही, तर मला जनता जास्त महत्वाची आहे.
संभाजीराजे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी दोन खासदार माझ्याकडे पाठविले. ऑबेरोय हॉटेलमध्ये आमची बैठक झाली. या बैठकीत मला दोघांनी सांगितले की, त्यांची इच्छा आहे. आपण शिवसेनेत प्रवेश करावा. आणि उद्याच्या उद्या आम्ही तुमची उमेदवारी जाहीर करू. पण, मी त्यांनी स्पष्टपणे सांगितले, मी राज्यसभा निवडणूक ही अपक्ष म्हणून लढणार आहोत. मी शिवसेनेत प्रवेश करू शकत नाही. कालपासून मला अनेक आमदारांचे फोन येत आहेत. राजे कुठल्याही परिस्थिती ही निवडणूक लढवायचीच. पण मला पूर्ण कल्पना आहे. यात निश्चित घोडेबाजार होणार आणि घोडेबाजारसाठी माझी उमेदवारी नाही. आणि घोडेबाजार होऊ नये म्हणून मी या निवडणुकीसमोर जाणार नाही. पण ही माघार नाही, हा माझा स्वाभिमान आहे.”
संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार
“आता या मिनिटाला स्वराज्य ही संघटना आहे. स्वराज्य संघटना मजबुत करणार आहे. आणि यापुढे मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. मला लोक एवढे प्रेम देतात. जसे मी २००९ मध्ये संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, तसेच मी आता पण संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. आता संघटीत तर करू, मला माझी ताकद बघायची आहे. माझी ताकद ही ४२ आमदार नाही. माझी ताकद ही जनता आहे. आणि म्हणून मी जनतेकडे निघायलोय,” असे संभाजीराजे म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.