HW News Marathi
महाराष्ट्र

संभाजीराजे,पवारांच्या जवळ जायचं असेल तर जा पण मराठा आरक्षणाचा विषय स्वत:साठी वापरू नका !

मुंबई | मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाज अस्वस्थ आहे. हे आरक्षण मिळवण्यासाठी सध्या राज्यभर खलबतं सुरू आहेत.प्रामुख्याने संभीजीराजे छत्रपती हे महाराष्ट्र दौरा करत आहेत ,नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.आज त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतील आणि दोघांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितल.मात्र संभीजीराजेंचं पवारांना भेटणं भाजपला रूचलेलं नाही.आधी चंद्रकांत पाटील आणि आता निलेश राणेंनी संभाजीराजेंवर निशाणा साधला आहे.

निलेश राणेंनी काय टिका केली ?

निलेश राणे यांनी अत्यंत आक्नक शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टिका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट केल आहे की, ‘संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महा विकास आघाडी च्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही.’त्यामुळे आता संभीजीराजेंवर भाजपचे नेते थेट टिका करत आहेत.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते ?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना डिवचले आहे.”भाजपने पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीत. संभाजीराजेंचा आम्ही केलेला सन्मान हा बहुदा इतरांना माहित नाही”, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

“अहमदाबादमध्ये संभाजीराजेंसाठी मोदींसह सर्वजण उभे राहीले. इतकेच काय तर शाहुंच्या वंशजांना पक्ष कार्यालयात बोलावू नका असेही मोदींनी म्हटले होते”, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. “मात्र भाजपने पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीत”, अशी नाराजी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी पंतप्रधान मोदींकडून भेटीसाठी वेळ मागितली होती. संभाजीराजेंनी ४ वेळा मोदींना याबाबतचे पत्र लिहिले होते. मात्र, तरीही मोदींनी आपल्याला भेटीसाठी वेळ न दिल्याने संभाजीराजेंनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर विरोधकांकडून देखील भाजपला लक्ष्य केले जाऊ लागले आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी भाजपची बाजू स्पष्ट करत संभाजीराजेंना डिवचले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हॉटेल, बार, उपहारगृहासाठी राज्य सरकारकडून नियमावली जारी!

News Desk

राष्ट्रवादीचा ‘हा’ मोठा नेता मोदींच्या कानमंत्रावर चालतो ,राज्यपालांचा गौप्यस्फोट!

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या रायगड फार्महाऊसची रेकी करणाऱ्या ३ जणांना अटक

News Desk