HW News Marathi
महाराष्ट्र

‘गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा !’ -छत्रपती संभाजीराजे

नांदेड | मराठा आरक्षणाचा मुद्दा आता शिगेला पेटला आहे. खासदार संभाजी राजे यांनी काल(२० ऑगस्ट) मराठा आरक्षणासाठी मूक मोर्च्याचे आयोजन केले होते. या मोर्च्यात हजारोंनी नागरिक जमा झाले होते. कोरोना निर्बंधांचं पालन न करता हा मोर्चा पार पडला. यावरून आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजी राजेंना अटक करण्याची मागणी केली आहे. संभाजी राजे यांनी आता त्यालाच प्रत्युत्तर दिलं आहे.

सामान्य गरीब मराठा बांधवांच्यावर का ?

छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विट करत त्यांचं प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा ! सामान्य गरीब मराठा बांधवांच्यावर का ?समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का ?”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

काय म्हणाले सदावर्ते?

गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजीराजेंच्या अटकेची मागणी केली आहे. ते म्हणाले, “खासदार संभाजी राजे यांनी कोरोना काळात मोर्चा काढला. न्यायालयाने असंविधानिक ठरवलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी मोर्चा काढला. उच्च न्यायालयाने कोरोना संकटाच्या काळात असे मोर्चे काढू नयेत, असे म्हटले आहे. लोकप्रतिनिधी असलेल्या संभाजीराजेंचे हे गुन्हेगारी कृत्य आहे. त्यामुळे त्यांना तातडीने अटक करायला हवी. याचबरोबर नक्षलवाद्यांच्या संदर्भात संभाजीराजेंनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करावी.

संभाजीराजे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का?

गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजी राजेंवर चांगलाच वार केला आहे. ते म्हणाले, ” मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे नांदेडचे पालकमंत्री आहेत. त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांनी याबाबत निर्देश द्यायला हवेत. अजित पवारांच्या घरासमोर लोक निदर्शने करतात त्यावेळी त्यांच्यावर गुन्हे दाखल होता. त्यांना 15 दिवस तुरुंगात टाकले जाते. संभाजीराजे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? नांदेडमध्ये बेकायदा काढलेला मोर्चा पांगवा. मोर्चाला झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत अन्यथा पुढील परिस्थितीला ते जबाबदार राहतील”, असा इशाराही सदावर्ते यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यात शिवशाही-खासगी बसमध्ये धडक, ५० जण जखमी

News Desk

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सरकार कटिबद्ध !

News Desk

“तपासावेळी सारखं पोलीसांना फोन केला की राजकीय हस्तक्षेप वाटतो म्हणुन…”!

News Desk