HW News Marathi
महाराष्ट्र

‘बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं’! प्रबोधनकारांचा दाखला देत सडेतोड प्रत्युत्तर

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यात सध्या वादाने पेट घेतला आहे. “सोयीचे प्रबोधनकार सांगू नका. त्यांची भूमिका त्या त्या काळाशी संबंधित होती, सांगायचे असतील तर पूर्ण प्रबोधनकार सांगा, नाहीतर नादी लागू नका, प्रबोधनकार तुम्हाला झेपणार नाहीत”, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला होता. आज प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकातील त्यांचा एक विचार सांगत राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं

राज ठाकरे यांनी काल(२० ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी आज(२१ ऑगस्ट) त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून पुन्हा साडेत्तड उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “”जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही… जिथे बौध्दिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय! प्रबोधनकार ठाकरे’माझी जीवनगाथा’ (पाने २८०-२८१)”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

यशवंतराव चव्हाण यांची पुस्तकं सुद्धा वाचली

मी एका कार्यक्रमात तसं विधान केलं होतं. पण, माझ्या विधानाचा आणि माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विधानाचा काय संबंध होता. ‘मी प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकंही वाचली आहे आणि यशवंतराव चव्हाण यांची पुस्तकं सुद्धा वाचली आहे. मी जे काही बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांचा काय संबंध होता हे शरद पवार यांनी समजून सांगावे’ असा पलटवार राज ठाकरे यांनी केला आहे.

त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला असं सांगताय

‘मी बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहास संशोधक म्हणून भेटलो होतो, ते ब्राम्हण आहे, म्हणून भेटायला गेलो नव्हतो. त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला असं सांगताय, पण नेमकं काय चुकीचं लिहिलं ते तरी सांगा. त्यांनी पहिलं पुस्तक हे 50 वर्षांपूर्वी लिहिलं होतं, मग त्यावेळी चुकीचं जाणवलं नाही का? नेमकं आताच वाद कशाला उकरून काढायचा. मुळात यांना तरुणांची डोकी फिरवण्यासाठी आहे. मुद्दामवरून हे सर्व सुरू आहे. हे सगळं ठरवून चाललं आहे, असा टोलाही राज ठाकरेंनी केला.माझ्या आजोबांच्या पुस्तकात ज्या काळात घडले त्यावर सर्व लिहिलेलं होतं. ते काय बोललं नेमकं आपल्या सोईनुसार घ्यायचं आणि बाकीचं ठेवून द्यायचं. मी यशवंत चव्हाण सुद्धा वाचले आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

लॉकडाऊन लागण्याच्या आधी मी सांगितलं होतं, पक्ष स्थापनेआधी हा झेंडा माझ्या डोक्यात होता. त्यानंतर मेळावा घेऊन झेंडा मी समोर आणला. हे माझ्या डोक्यात होतं ते मी केलं. त्यामुळे झेंडा आणि हिंदुत्व असं काही विषय नव्हता. एक गोष्ट लक्षात ठेवावं, मी एका कडवड हिंदूत्त्व घराण्यात जन्माला आलो आहे, माझ्यावर तेच संस्कार आहे, असंही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझेंना लक्ष्य केलं जातंय – संजय राऊत

News Desk

आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही, फडणवीसांची पंढरपूरात फटकेबाजी!

News Desk

मराठा आरक्षण | संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू

News Desk