HW News Marathi
महाराष्ट्र

समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत ठरले तर…खासदार संभाजीराजेंचा सरकारला इशारा

कोल्हापुर | गेले अनेक दिवस प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणावर सुनावणी सुरु होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर विरोधकांकडून महाविकासआघाडीवर टीकास्त्र सुरु झाले. सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०१८ साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने काल (९ सप्टेंबर) तात्पुरती स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

यावर खासदार संभाजीराजे यांनी सरकारला इशारा दिला आहे. “मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे”.

“राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अशी अपेक्षा आहे. मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारी पूर्वक सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल“, असे त्यांनी सोशल माध्यमातून सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राजीनामा देणार?

swarit

‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम यशस्वी करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna

MPSCExam : विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण होतंय, फडणवीस सरकारवर भडकले

News Desk