HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राजीनामा देणार?

मुंबई । विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १५ दिवस उलटून गेले असून ही राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. जर आज (८ नोव्हेंबर) काही निर्णय झाला नाही. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री सरकारी गाड्या आणि इतर सुविधा परत करण्यात शकतात वर्तवली जात आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये दोघांमध्ये मुख्यमंत्री पदावरून ठाम भूमिका घेतली आहे. तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत. तेरावी विधानसभा ही १०नोव्हेंबर २०१४ रोजी अस्तित्त्वात आली होती. ९ नोव्हेंबर रोजी पाच वर्षे पूर्ण होत असल्याने विधानसभेचा कार्यकाळ हा संपुष्टात येणार आहे. घटनात्मक तरतुदीनुसार त्यापूर्वी नवे सरकार अस्तित्त्वात येणे आवश्यक आहे. सरकारचा कार्यकाळ संपण्यास अवघे काही तासच शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरीत कालावधीत जर नवे सरकार अस्तित्वात आले नाही तर, घटनात्मक पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे एक तांत्रिक बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडीतील ‘हा’ पक्ष स्वबळावर मैदानात

News Desk

“आंदोलनजीवी म्हणत हिणवलेल्या शेतकऱ्यांचा अखेर विजय” – नाना पटोले

News Desk

“मला बदनाम करण्यासाठी हे केलं असावं”, रक्षा खडसे यांची ‘त्या’ प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया 

News Desk