HW News Marathi
महाराष्ट्र

संभाजी राजेंकडून कोल्हापूर पूर्वपरिस्थितीची पाहणी, म्हणाले……

कोल्हापूर। कोल्हापूर मध्ये पंचगंगा नदीने पाण्याची पातळी ओलांडल्याने पूरपरस्थिती निर्माण झाली आहे. केवळ पंचगंगा नव्हे तर इतर नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडल्याने ही दुर्घटना घडली आहे . खासदार संभाजी राजे यांनी आज(२५ जुलै) कोल्हापुरातल्या पूर्वपरिस्थितीची पाहणी केली आहे. कोकणात NDRF ची टीम वेळेवर पोहोचली असून लोकांचे प्राण वाचले आहेत.

आता धास्ती वाटत नाही

२०१९ मध्ये कोल्हापुरात पूर आला होता आणि सगळंच वाहून गेलं होतं. तशीच परिसथिती आता निर्माण झाली आहे. ‘२०१९ साली आलेल्या महापुराचा फटका बसला होता, मात्र यंदा त्याची धास्ती नाही’, असं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर शहर आता कोणत्याही संकटाला सामोरं जायला सज्ज आहे. या पुरा वेळेत NDRF ची टीम आली आणि लोकांना वाचवण्यात आलं आहे.

शाश्वत विकास केला पाहिजे

संभाजी राजेंची या वेळेस काही महत्वाच्या मुद्द्यांना प्राध्यान्य दिलं आहे. कोलापूरमध्ये शाश्वत विकास केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आपत्कालीन स्थितीत शहराबाहेर पडता येत नाही त्यासाठी महामार्गावरील हायवे ग्रीन कॉरिडॉर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोबतच तंत्रज्ञानाचा वापर केले पाहिजे, दरवर्षी महापूर येणार, उपाययोजना केल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे.

२०१९ सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे

पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात सरासरी १५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. आज रात्रीपर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी ५३ फुटावर जाण्याचा अंदाज आहे. दुर्देवाने जिल्ह्यात २०१९ सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात आलं आहे. तसेच गरज भासल्यास एनडीआरएफच्या आणखी दोन टीम जिल्ह्यात मागवण्यात येणार आहे, असं सतेज पाटील यांनी सांगितलं आहे.

नेव्ही आणि आर्मी होल्डवर

हॉस्पिटलमध्ये अडकून पडलेल्या सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांना शहरातील इतर हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत. सध्या नेव्ही आणि आर्मी यांना होल्डवर ठेवला आहे. गरज वाटल्यास त्यांना ही बोलावू. मात्र सध्या तशी परिस्थिती नाही. मुख्यमंत्र्यांना पूरपरिस्थिती संदर्भात माहिती दिली आहे. आवश्यक ती मदत करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सद्यस्थितीचा आढावा घेऊन अधिक कठोर पावले उचलणार !

swarit

‘आता गोकुळचा दबदबा मुंबईत वाढवणार ‘सतेज पाटलांचं ठरलयं!

News Desk

सचिन वाझे प्रकरणाचा सरकारला कोणताही धोका नाही, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचं विधान

News Desk