HW News Marathi
महाराष्ट्र

संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू – संभाजीराजे 

उस्मानाबाद | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाज आक्रमक होत चालला आहे. आज (९ ऑक्टोबर) उस्मानाबाद येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे उपस्थित होते. यावेळी त्यांनी संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा सरकारला दिला आहे. आम्ही भीक नाही तर हक्क मागत आहोत. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असंही संभाजीराजे म्हणाले. तसेच येत्या १५ तारखेला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. या आंदोलनाला संभाजीराजेंनी हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी ठाकरे सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत असं दिसून येतं आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयही नाही असाही आरोप संभाजी राजेंनी केला आहे. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका. आम्ही दिल्लीला येण्यासाठीही घाबरणार नाही अशा शब्दात केंद्र सरकारने राज्य व केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. राज्यात होणारी आंदोलनं ही भाजपा पुरस्कृत नाहीत असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केले आहे.

१९०२ मध्ये शाहू मराजाांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं. त्यात मराठा समाजाचाही समावेश होता. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होणे आवश्यक आहे. ८० टक्के मराठा समाज गरी आहे. मात्र आम्ही भीक मागत नाही हक्काचे आरक्षण मागतो आहोत. आम्हाला आता गृहीत धरु नका आणि कायदा हातात घ्यायची वेळ आमच्यावर आणू नका. माझ्या रक्तात शिवाजी महाराज आणि शाहू मराज आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ समीक्षक मधुकर पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार

News Desk

वंचितांचा लढा लढणे, ज्यांचा कुणी वाली नाही त्यांची वाली होणे ही माझी भूमिका – पंकजा मुंडे

News Desk

कल्याण पूर्वेकडील स्कायवॉकचे काम पूर्ण

News Desk