HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी संभाजीराजेंनी मांडले ३ पर्याय

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून भाजप खासदार संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली. “सकल मराठा समाजाच्या वतीने मी बोलत आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात किंवा कोणता राजकीय अजेंडा घेऊन अजिबात आलेलो नाही.

“आमची एकच मागणी आहे की सकल मराठा समाजाला न्याय मिळावा. मी सांगू इच्छितो, २००७ सालापासून मी महाराष्ट्र पिंजून काढला कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात मराठा समाजावर अन्याय होतोय यासाठी माझा हा लढा आहे”, असं ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, आज (२८ मे) संभाजीराजे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दौरा करताना ज्या तज्ञांसोबत बातचीत केली त्यांच्याशी बोलून ३ पर्याय काढले आहेत ते वाचून दाखवले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असताना संभाजीराजे यांनी हे ३ पर्याय वाचून दाखवले. यावेळी ते म्हणाले की सत्ताधारी आणि विरोधक यांनाही हे पर्याय मान्य आहेत जर यात बदल झाले तर त्याला सर्वस्वी ते जबाबदार असतील.

काय आहेत ३ पर्याय?

* पहिला पर्याय : Review Petition फाईल करा, फुल प्रूफ प्लॅन करून हे Petition करू शकता

* दुसरा पर्याय : Review Petition टिकली नाही तर Curative Petition फाईल करा

* तिसरा पर्याय 342 A मार्फत आपल्या मागण्या केंद्रापर्यंत पोहोचवू शकता.या माध्यमातुन आपलं प्रपोजल राज्यपालांसमोर मांडवं लागेल त्यांनतर केंद्रापुढे मांडावं लागेल. गायकवाड अहवालातील त्रुटी दूर कराव्या आणि मग तो अहवाल राष्ट्रपती यांच्याकडे पाठवावा.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून शरद पवार यांना हे ३ पर्याय सांगण्यात आले आहेत. त्यांनी हे मान्य केले आहेत. त्यामुळे या पर्यायावर सत्ताधारी आणि विरोधक काय भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

संभाजीराजे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

* सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला,आम्ही दुःखी झालो पण मी सामोपचाराची भूमिका घेतली. कोरोना काळात उद्रेकनको अशी ईच्छा होती.

* माझी भूमिका मवाळ का?असा प्रश्न अनेकांना पडला होता

* सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आम्हाला ह्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही.

* मराठा समाजाला वेठीस धरू नका.

* नाशिकमध्ये म्हणून मी समाजासाठी आक्रमक झालो, अस्वस्थ झालो

* समाजातील लोक अत्यंत दुःखी. कायदाही हातात घेतील अशी मानसिक स्थिती आहे.

* पण माझ्यामुळे समाज शांत आहे.

* आम्ही यापुढे हे सगळे चालू देणार नाही. सहन करणार नाही.

* अनेकांची ईच्छा आपण OBC मध्ये जावे. प्रत्येकाला विचार मांडायचे स्वातंत्र्य

* OBC मध्ये नवा प्रवर्ग तयार करून देता येऊ शंकतो का हे मी नाही उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीस, अशोक चव्हाणांनी सांगायचं

* मी म्हटलं ना आता आम्ही सामाजिक मागास राहिलो नाही ( उपरोधिक)

*बाबासाहेब आंबेडकरांचीही ईच्छा होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं

* 1967 मध्ये ओबीसीमध्ये आपल्याला आरक्षण मिळत होते.

* मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले, आज सरकार तुमचे. तुमच्या हातात हे आहे ते तुम्ही करू शकता नाही.

* 1 . 9 सप्टेंबर 2020 च्या आधी निकाल लागलेत त्यांना रुजू करून घ्या, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय

* 2. सारथीची काय अवस्था करून टाकली ? सारथीला जर योग्य ती मदत केलीत तर आरक्षणापेक्षाही कैक पटीने उपयोगी पडेल**

* सारथीत समाजाची लोकं घ्या ना. सारथीला 2 वर्षांत कमीत कमी 1000 कोटी रुपये द्यायला हवे. आम्ही नियोजन करतो ना

* नीट करा नाहीतर बंदच करून टाका. शाहू महाराजांच्या नावाने चालवू नका मला अध्यक्ष बोलवू नका

* आण्णासाहेब पाटील महामंडळला 10 लाख काय ? 25 लाख द्या

* दर जिल्ह्याला वसतिगृह द्या ना. सोलापूरला वसतिगृह दिलंय पण सुरूच नाही केलं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला… शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ !

Adil

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सोलापूर दौऱ्याला सुरुवात

News Desk

सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला स्थगिती

News Desk