HW News Marathi
महाराष्ट्र

६ जूनला शिवराज्याभिषेकापर्यंत भूमिका घ्या नाहीतर…रायगडावरून आंदोलन जाहीर होणार !

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून भाजप खासदार संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. आज (२८ मे) मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली. “सकल मराठा समाजाच्या वतीने मी बोलत आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात किंवा कोणता राजकीय अजेंडा घेऊन अजिबात आलेलो नाही.

गेले अनेक दिवस शांत असलेले संभाजीराजे आक्रमक होताना दिसले. यावेळी त्यांनी ६ जूनला राज्याभिषेक सोहळा आहे. या दिवसापर्यंत जर मराठा आरक्षणाची भुमिका मांडली नाही. काही तोडगा काढला नाही तर याच रायगडावरून आंदोलनाची भुमिका जाहिर करू. लोकांना नाही तर खासदार, आमदार यांना सोबत घेत या आंदोलनाची वाटचाल करू.

दरम्यान, आज (२८ मे) संभाजीराजे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दौरा करताना ज्या तज्ञांसोबत बातचीत केली त्यांच्याशी बोलून ३ पर्याय काढले आहेत ते वाचून दाखवले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असताना संभाजीराजे यांनी हे ३ पर्याय वाचून दाखवले. यावेळी ते म्हणाले की सत्ताधारी आणि विरोधक यांनाही हे पर्याय मान्य आहेत जर यात बदल झाले तर त्याला सर्वस्वी ते जबाबदार असतील असं म्हटलं आहे.

संभाजीराजे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

* मराठा समाजासाठीविशेष समिती स्थापन करा ना, आमच्यासारख्या लोकांना घ्या ना

* ओबीसीप्रमाणे मराठ्यांनाही शैक्षणिक सवलती द्या ना

* 6 जून शिवरयांचा राज्याभिषेक सोहळा. 6 जूनपर्यंत निकाल लागला नाही तर आमची आंदोलनाची भूमिका रायगडावरूनच जाहीर होणार.

* शिवाजी महाराज इथे असले असते तर त्यांनी आपल्या मावळ्यांना असे टाकले असते का ?

* 6 जूनपर्यंत तुम्ही भूमिका घेतली नाही तर त्यानंतर कोविडवैगरे काही मागेपुढे बघणार नाही. आम्ही सगळे जण असू. आम्हाला वेठीस धरू

* सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला,आम्ही दुःखी झालो पण मी सामोपचाराची भूमिका घेतली. कोरोना काळात उद्रेकनको अशी ईच्छा होती.

* माझी भूमिका मवाळ का?असा प्रश्न अनेकांना पडला होता

* सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आम्हाला ह्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही.

* मराठा समाजाला वेठीस धरू नका.

* नाशिकमध्ये म्हणून मी समाजासाठी आक्रमक झालो, अस्वस्थ झालो

* समाजातील लोक अत्यंत दुःखी. कायदाही हातात घेतील अशी मानसिक स्थिती आहे.

* पण माझ्यामुळे समाज शांत आहे.

* आम्ही यापुढे हे सगळे चालू देणार नाही. सहन करणार नाही.

* अनेकांची ईच्छा आपण OBC मध्ये जावे. प्रत्येकाला विचार मांडायचे स्वातंत्र्य

* OBC मध्ये नवा प्रवर्ग तयार करून देता येऊ शंकतो का हे मी नाही उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीस, अशोक चव्हाणांनी सांगायचं

* मी म्हटलं ना आता आम्ही सामाजिक मागास राहिलो नाही ( उपरोधिक)

*बाबासाहेब आंबेडकरांचीही ईच्छा होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं

* 1967 मध्ये ओबीसीमध्ये आपल्याला आरक्षण मिळत होते.

* मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले, आज सरकार तुमचे. तुमच्या हातात हे आहे ते तुम्ही करू शकता नाही.

* 1 . 9 सप्टेंबर 2020 च्या आधी निकाल लागलेत त्यांना रुजू करून घ्या, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय

* 2. सारथीची काय अवस्था करून टाकली ? सारथीला जर योग्य ती मदत केलीत तर आरक्षणापेक्षाही कैक पटीने उपयोगी पडेल**

* सारथीत समाजाची लोकं घ्या ना. सारथीला 2 वर्षांत कमीत कमी 1000 कोटी रुपये द्यायला हवे. आम्ही नियोजन करतो ना

* नीट करा नाहीतर बंदच करून टाका. शाहू महाराजांच्या नावाने चालवू नका मला अध्यक्ष बोलवू नका

* आण्णासाहेब पाटील महामंडळला 10 लाख काय ? 25 लाख द्या

* दर जिल्ह्याला वसतिगृह द्या ना. सोलापूरला वसतिगृह दिलंय पण सुरूच नाही केलं.

काय आहेत ३ पर्याय?

* पहिला पर्याय : Review Petition फाईल करा, फुल प्रूफ प्लॅन करून हे Petition करू शकता

* दुसरा पर्याय : Review Petition टिकली नाही तर Curative Petition फाईल करा

* तिसरा पर्याय 342 A मार्फत आपल्या मागण्या केंद्रापर्यंत पोहोचवू शकता.या माध्यमातुन आपलं प्रपोजल राज्यपालांसमोर मांडवं लागेल त्यांनतर केंद्रापुढे मांडावं लागेल. गायकवाड अहवालातील त्रुटी दूर कराव्या आणि मग तो अहवाल राष्ट्रपती यांच्याकडे पाठवावा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजपासून भरता येणार बारावीच्या परीक्षेचे अर्ज

News Desk

राजकारणाचे गुन्हेगारीकरण करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा- चंद्रकांत पाटील

News Desk

शरद पवारांच्या भेटीनंतर खडसे आज उद्धव ठाकरेंना भेटणार

News Desk