HW News Marathi
महाराष्ट्र

…तरच स्वतंत्र राजकिय पक्षाचा विचार केला जाईल- संभाजीराजे छत्रपती

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर सध्या खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत.हा प्रश्न सोडवण्यात प्रस्थापित पक्षांना येत असलेले अपयश बघून आता समाजामधील काही लोक संभाजीराजेंनी नवीन पक्ष काढावा असा आग्रह धरत आहेत. सोशल मिडीयावर अनेकांनी तशा पोस्ट टाकायला सुरूवात केली आहे. संभाजीराजेंचा पाठीशी सर्व सामान्य जनता ठामपणे उभी राहील,असे काही जणांना वाटतयं.

याच स्वतंत्र पक्ष काढण्याच्या मुद्द्यावर पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांना प्रश्न विचारल्यावर संभाजीराजे म्हणाले की, जर बहुजन समाजाची ईच्छा असेल तर स्वतंत्र राजकिय पक्षाचा निश्चित विचार केला जाईल. मात्र, आता यावर ठोस काही सांगू शकत नाही पण गरज असेल तर विचार करू, असं संभाजीराजे म्हणाले.

तर राजीनाम्याबाबत विचारले असता मराठा समाजाला मी राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असेल तर आता लगेच देतो राजीनामा देतो असं म्हणाले आहेत.

संभाजीराजेंच्या भेटींचं सत्र !

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार संभाजीराजे सध्या महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. आज (२८ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीराजे यांनी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे देखिल उपस्थितीत होते. त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर संभाजीराजे पत्रकार परिषद घेणार आहेत.आज (२८ मे) १२ वाजता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर संभाजीराजेंनी महसूलमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेतली.

संभाजीराजे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

* मी खासदार झाल्यापासून जी कामे कधीही झाली नाहीत ती कामे केली

* पवारसाहेब म्हणाले की त्यांनाही हे मुद्दे पटलेले आहेत. सर्वपक्षीय बैठकीत पवारांनीही यावे हे माझे आमंत्रण

* दोन्ही सरकारांमुळे समाजाचे नुकसान.

* माझा कोण वापर करून घेणार ? मी छत्रपतींच्या घरात जन्मलोय (प्रश्न : शिवसेना तुमचा वापर करून घेतेय का? )

* राणेंचे ठिके ते माजी मुख्यमंत्री आहेत. मी त्यांनाही भेटणार होते पण शक्य झाले नाही

* मराठा समाजासाठीविशेष समिती स्थापन करा ना, आमच्यासारख्या लोकांना घ्या ना

* ओबीसीप्रमाणे मराठ्यांनाही शैक्षणिक सवलती द्या ना

* 6 जून शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. 6 जूनपर्यंत निकाल लागला नाही तर आमची आंदोलनाची भूमिका रायगडावरूनच जाहीर होणार.

* शिवाजी महाराज इथे असले असते तर त्यांनी आपल्या मावळ्यांना असे टाकले असते का ?

* 6 जूनपर्यंत तुम्ही भूमिका घेतली नाही तर त्यानंतर कोविडवैगरे काही मागेपुढे बघणार नाही. आम्ही सगळे जण असू. आम्हाला वेठीस धरू

* सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला,आम्ही दुःखी झालो पण मी सामोपचाराची भूमिका घेतली. कोरोना काळात उद्रेकनको अशी ईच्छा होती.

* माझी भूमिका मवाळ का?असा प्रश्न अनेकांना पडला होता

* सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आम्हाला ह्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही.

* मराठा समाजाला वेठीस धरू नका.

* नाशिकमध्ये म्हणून मी समाजासाठी आक्रमक झालो, अस्वस्थ झालो

* समाजातील लोक अत्यंत दुःखी. कायदाही हातात घेतील अशी मानसिक स्थिती आहे.

* पण माझ्यामुळे समाज शांत आहे.

* आम्ही यापुढे हे सगळे चालू देणार नाही. सहन करणार नाही.

* अनेकांची ईच्छा आपण OBC मध्ये जावे. प्रत्येकाला विचार मांडायचे स्वातंत्र्य

* OBC मध्ये नवा प्रवर्ग तयार करून देता येऊ शंकतो का हे मी नाही उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीस, अशोक चव्हाणांनी सांगायचं

* मी म्हटलं ना आता आम्ही सामाजिक मागास राहिलो नाही ( उपरोधिक)

*बाबासाहेब आंबेडकरांचीही ईच्छा होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं

* 1967 मध्ये ओबीसीमध्ये आपल्याला आरक्षण मिळत होते.

* मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले, आज सरकार तुमचे. तुमच्या हातात हे आहे ते तुम्ही करू शकता नाही.

* 1 . 9 सप्टेंबर 2020 च्या आधी निकाल लागलेत त्यांना रुजू करून घ्या, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय

* 2. सारथीची काय अवस्था करून टाकली ? सारथीला जर योग्य ती मदत केलीत तर आरक्षणापेक्षाही कैक पटीने उपयोगी पडेल**

* सारथीत समाजाची लोकं घ्या ना. सारथीला 2 वर्षांत कमीत कमी 1000 कोटी रुपये द्यायला हवे. आम्ही नियोजन करतो ना

* नीट करा नाहीतर बंदच करून टाका. शाहू महाराजांच्या नावाने चालवू नका मला अध्यक्ष बोलवू नका

* आण्णासाहेब पाटील महामंडळला 10 लाख काय ? 25 लाख द्या

* दर जिल्ह्याला वसतिगृह द्या ना. सोलापूरला वसतिगृह दिलंय पण सुरूच नाही केलं.

काय आहेत ३ पर्याय?

* पहिला पर्याय : Review Petition फाईल करा, फुल प्रूफ प्लॅन करून हे Petition करू शकता

* दुसरा पर्याय : Review Petition टिकली नाही तर Curative Petition फाईल करा

* तिसरा पर्याय 342 A मार्फत आपल्या मागण्या केंद्रापर्यंत पोहोचवू शकता.या माध्यमातुन आपलं प्रपोजल राज्यपालांसमोर मांडवं लागेल त्यांनतर केंद्रापुढे मांडावं लागेल. गायकवाड अहवालातील त्रुटी दूर कराव्या आणि मग तो अहवाल राष्ट्रपती यांच्याकडे पाठवावा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुसऱ्या भाषेचा द्वेष करायचा नसला तरीही मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये! – उद्धव ठाकरे

Aprna

हिरेन मृत्यूप्रकरण कोणीही राजकीय प्रतिष्ठेचा विषय करू नये, राऊतांचा विरोधकांना सल्ला  

News Desk

“बैलगाडी शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल” – जयंत पाटील

News Desk