HW News Marathi
महाराष्ट्र

 ‘खासदारकी मागायला आलो नव्हतो’चंद्रकांत पाटलांना संभाजीराजेंचा घरचा आहेर…

कोल्हापूर | खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली होती. तर 6 जूनला रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली होती

आज पासून (16 जुन) कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी पासून मराठा आरक्षण आंदोलनाला सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात झाली. तर पहिल्या टप्प्यात हे आंदोलन पाच जिल्ह्यांमध्ये पार पडणारे तर या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून झाली. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी दिलेल्या हाकेला प्रकाश आंबेडकर, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार विनय कोरे, सतेज पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावली होती.

छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य होतं की, ‘संभाजीराजे मान्य करत नसले, तरी ते ऑन पेपर भाजपाचे खासदार आहेत’, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांच्या भूमिकेवर विधान केलं होतं. कोल्हापुरात आंदोलन स्थळाला काल भेट दिल्यानंतर छत्रपती संभाजी राजेंनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर टोला देत म्हटलंय की, ‘ मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, हे पद मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो, त्यांनी स्वतःहून मला हे पद सन्मानाने दिल आहे. अशा शब्दांत संभाजीराजेंनी पाटलांना घरचा आहे दिलाय.

आज चंद्रकांत पाटलांनी आंदोलनाला भेट दिल्यानंतर काय म्हटलं ते आपण पाहूया

1)मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर, ते पुन्हा मिळेपर्यंत फडणवीस सरकारने ज्या सवलती दिल्या होत्या त्या पुन्हा सुरु करण्यासाठी जे आंदोलनं करतील त्यांच्यामागे भाजपा हा पक्ष स्वतःचे चिन्ह न लावता उभा राहील !

2) ५ जुलैपासून विधानसभा व विधानपरिषद अधिवेशन आहे. Devendra Fadnavis सरकारने मराठा समाजाला दिलेल्या सवलतीसाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी,पहिल्याच क्षणाला, राष्ट्रगीत झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी पेटून उठलं पाहिजे !

3) या आंदोलनात मी कोल्हापूरचा नागरिक म्हणून आलो आहे, त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांसमोर जर काही भूमिका मांडायची असेल तर ती मी पुण्यात मांडेन.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काँग्रेसमध्ये रोज लाथा बुक्क्यांचा मार”- आशिष शेलार

News Desk

परमबीर सिंग यांच्या प्राथमिक चौकशीचेे गृहविभागाने दिले आदेश

News Desk

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन होईल !

News Desk