HW News Marathi
देश / विदेश

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजेंचे पंतप्रधानांना दुसऱ्यांदा पत्र

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वेळा पत्र लिहिले आहे. या दोन्ही पत्रातून संभाजीराजेंनी पंतप्रधानांकडून भेटीसाठी वेळ मागितली आहे. मात्र अद्याप संभाजीराजेंना मोदींनी भेटीसाठी वेळ दिलेली नाही.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली २० पेक्षा जास्त पक्षांच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींकडून भेटीची वेळ मागितली आहे. मात्र अद्याप मोदींनी खासदारांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ दिली नाही आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकार गंभीर दिसत नसल्याची टीका अनेक स्तरांतून केली जात आहे.

संभाजीराजे यांनी मोदींना पत्र लिहत पुन्हा एका भेटीची मागणी केली आहे. मात्र दोन वेळा पत्र लिहिल्यानतंरही त्यांना याबाबत काही प्रत्युत्तर मिळाले नाही आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान मराठा आरक्षणाचा तिढा सर्वोच्च न्यायालयात सुटेपर्यंत ठाकरे सरकारने मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना दिलासा देण्यासाठी ८ महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेला लाभ एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना देण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळात नोकरीत घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आरे’तील पुढील निर्देशापर्यंत एकही वृक्ष तोड करू नका! – सर्वोच्च न्यायालय

Aprna

नोटबंदी एक अविचारी निर्णय | रघुराम राजन

News Desk

लष्करी अधिकारी मारवाहला हनी ट्रॅपच्या जळ्यात

News Desk