HW News Marathi
महाराष्ट्र

समीर भुजबळ आणि रुपाली चाकणकर पोलिसांच्या ताब्यात

पुणे | पुण्यात ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी महात्मा फुले समता परिशदेसह विविध संघटनांनी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढला होता.या मोर्च्याला पोलीसांचा विरोध होता तरीही मोर्चा काढल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते समीर भुजबळ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी ओबीसी आरक्षाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. त्याचा एक भाग म्हणून पुण्यात आम्ही आंदोलनाची तयारी केली होती. मात्र, पोलिसांनी आम्हाला मोर्चा काढू दिला नाही. आमची आजही तीच भूमिका आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं, असे मत समीर भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा आयोजित करण्यात आला होता. हा मोर्चा समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी आमदार दीप्ती चौधरी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो’, ‘जय ज्योती जय संविधान’ यासह विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या मोर्चाला पोलीस विभागाची परवानगी नव्हती. तरी मोर्चेकरी त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने समीर भुजबळ, रूपाली चाकणकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर आंदोलनामुळे शनिवार वाड्याच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सातारा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, पोटनिवडणूक लढविण्यास कोणी तयार नाही

News Desk

शिवसेनेने पाठींबा दाखवण्यास असमर्थता दाखवली – पंकजा मुंडे

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील बर्ड फ्ल्यू परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार

News Desk