HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांचे भाचे समीर देसाई यांनी हाती बांधले शिवबंधन

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष बदलत वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अशात मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर देसाईंनी शिवबंधन हाती बांधले. समीर देसाई हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे भाचे आहेत. बीएमसी निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असताना भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. समीर देसाई हे काँग्रेसकडून दोन वेळा नगरसेवक राहिले होते. त्यांनी मुंबई काँग्रेसचे प्रवक्तेपदही भूषवलं आहे. सलग दहा वर्ष समीर देसाई मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते.

काँग्रेसमधून त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत देसाईंचा भाजपप्रवेश झाला होता. प्रवेशानंतर लगेचच त्यांना भाजपचं सचिवपद देण्यात आलं होतं. मात्र आता भाजपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती आहे.

कोण होते गुरुदास कामत ?

काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे ऑगस्ट २०१८ मध्ये निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या 63 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली होती. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुदास कामत यांनी निधनाच्या वर्षभर आधी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी आणि पर्यायाने गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेल्या गुरुदास कामतांनी मुंबईसह महाराष्ट्रात काँग्रेस वाढीसाठी मोलाची भूमिका बजावली होती.

गुरुदास कामतांचा राजकीय प्रवास कसा होता?

१९७२ साली विद्यार्थी चळवळीतून राजकीय क्षेत्रात प्रवेश

१९७६ साली एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

१९८४ साली पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर

५ वेळा ईशान्य मुंबईमधून लोकसभेत प्रतिनिधित्व

२००९ ते २०११ यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम

केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचाही अतिरिक्त कारभार

२०१४ मध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांकडून कामतांचा पराभव

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संजय राऊतांनी सांगितलं BJP सोबतचं 25 वर्षांचं नातं!

News Desk

“पवार कधीच खोटं बोलत नाहीत म्हणणं म्हणजे…!” बोंडेंची पवारांवर बोचरी टीका

News Desk

RSS चे सरसंघचालकांना कोरोना झाल्यावर अमोल मिटकरी म्हणतात,”आता भिडे गुरुजींना विचारा”

News Desk